पुणे - पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची आठवण काढली तर त्यांसोबत नाव लागते मस्तानीचे. मस्तानी पुण्याजवळील पाबळ येथे वास्तव्यास होती. अखेरच्या श्वासापर्यंत मस्तानीने बाजीरावांच्या शौर्याची गाथा याच ठिकाणाहून गायली. या पाबळमध्ये आता मस्तानीच्या 9 व्या वंशातील कुटुंबीयांनी मस्तानीच्या समाधी स्थळाला भेट दिली.
पराक्रमी योद्धा म्हणून बाजीरावांकडे पाहिले जाते आणि त्यानंतर नृत्यांगना तलवारबाजीसह अनेक शस्त्रविद्या पारंगत असलेली धुरंदर योद्धा म्हणून मस्तानीची एक वेगळी ओळख आहे. मात्र, बाजीराव व मस्तानीच्या मृत्यूनंतर मस्तानीची समाधी पाबळ या ठिकाणी बांधण्यात आली. ज्या मस्तानीची ओळख संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी राहिली त्या मस्तानीचे समाधीस्थळ आज दुर्लक्षित असल्याची खंत मस्तानीच्या नव्या पिढीने व्यक्त केली.
हेही वाचा - महाराष्ट्र केसरी: दोस्तीत दोस्ती कुस्तीत कुस्ती...! हे फक्त महाराष्ट्रात घडू शकतं
बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने बहुमूल्य अशी हिरकणी (हिरा) गिळून आत्महत्या केली होती, अशी दंतकथा सांगितली जाते. तो बहुमूल्य हिरकणी हिरा आपल्याला मिळेल. या हेतूने 2009 मध्ये काही चोरट्यांनी ही समाधी खोदली ही खेदाची बाब आहे. त्यानंतर या समाधीचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले. मात्र, त्यातही भ्रष्टाचार होऊन ही वास्तू आज दुर्लक्षित झाली असून या ठिकाणी मस्तानीच्या शौर्याच्या गाथा नव्या तरुण पिढीला प्रेरणा देणारी असतानाही याकडे आजही दुर्लक्ष होत आहे, ही खेदाची बाब असल्याचे सना अली बहादूर यांनी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर हर्षवर्धन म्हणाला, दोघा भावांमध्ये लढत झाली...