ETV Bharat / state

PDCC Bank Election : पुणे जिल्हा बॅंकेवर उपमुख्यमंत्री पवार बिनविरोध - Satish Kakade

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Pune District Central Co-operative Bank) बिनविरोध निवडून जाण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे (Satish Kakade) यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.

सतीश काकडे
सतीश काकडे
author img

By

Published : Dec 8, 2021, 3:47 PM IST

बारामती (पुणे) - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Pune District Central Co-operative Bank) पंचवार्षिक निवडणूकीत संचालकपदी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. 'अ वर्ग सोसायटी प्रतिनिधी' गटात बारामतीतून अर्ज दाखल केलेल्या शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे (Satish Kakade) यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे पवार यांचा बॅंकेवर बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूकीला सामोरे जावे लागणार की, ते बिनविरोध होणार याकडे लक्ष लागले होते. जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपविलेल्या ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर (Kiran Gujar) यांनी बुधवारी (दि. ८) सकाळी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे जात काकडे यांनी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध संधी मिळाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.