पुणे - शहरात दरदिवशी कोरोनाग्रस्तांची मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे, अशातच रेमडेसिवीर हे उपचारात महत्त्वाचे औषध असल्याने त्याची उपलब्धता सुरळीत होणे अपेक्षित आहे. पण, पुणे शहरात या औषधांचा तुटवडा भासत असून यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हे औषध उपलब्ध करून देण्यात यावे व काळाबाजार थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा भाजयुमोचा इशारा - पुणे रेमडिसिवीर बातमी
रेमडेसिवीर औषधांच्या किमतीत समानता आणा, काळाबाजार थांबवा, या मागणीसाठी पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर भाजयुमोकडून निदर्शने करण्यात आली.
आंदोलक
पुणे - शहरात दरदिवशी कोरोनाग्रस्तांची मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे, अशातच रेमडेसिवीर हे उपचारात महत्त्वाचे औषध असल्याने त्याची उपलब्धता सुरळीत होणे अपेक्षित आहे. पण, पुणे शहरात या औषधांचा तुटवडा भासत असून यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हे औषध उपलब्ध करून देण्यात यावे व काळाबाजार थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहे.
Last Updated : Oct 5, 2020, 4:48 PM IST