पुणे - कांद्यानंतर आता बटाट्याचा शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजारसमितीत बटाट्याचे बियाणं विक्रीसाठी आले आहे. मात्र, हे बियाणं घ्यायला शेतकरी येत नसल्याच चित्र आहे. त्यामुळे पुण्यातील बटाटा उत्पादकांचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पुण्यातील बटाटा उत्पादकांचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील खेड, आंबेगाग आणि जुन्नर तालुक्यात दरवर्षी 60 हजार एकरवर बटाट्याची होते. गतवर्षी आवकाळी पावसामुळे काढणीला आलेला बटाटा मातीतच सडला. त्यामुळे बटाट्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा पीक घेण्यास नापसंती दर्शवली आहे. त्यातच यंदा कोरोनाचे संकट असल्याने शेतक-यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरवली आहे. आता बटाट्याचे बियाणं बाजारसमितीतच खराब होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहे.बटाटा लागवडीच्या हंगामासाठी मंचर बाजारसमितीत बियाणं मोठ्या प्रमाणात आले आहे. यंदा लॉकडाऊनच्या फटक्यामुळे दरवर्षीपेक्षा 500 ते 700 रुपयांनी बियाणे महागले आहे. परीणामी मंचर बाजारसमितीत तीन लाख बटाटा वाणांचे बियणे केवळ मागणी अभावी पडून आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून यंदा सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याते वर्तवला आहे. मात्र, बटाट्याला बाजारभाव नसल्याचे कारण सांगत शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीला पर्याय शोधले आहेत. बटाट्याला येणारा भांडवली खर्च वाढलाय. त्यातच बाजारभाव पडल्याने आणि आणखी परिस्थिती खालावली आहे. दरवर्षीचा बटाटा हंगाम शेतक-यांना तोट्यात घेऊन जात असताना यंदा बटाटा लागवडीला कोरोनाचे ग्रहण लागले. त्यामुळे सरकारने बटाटा लागवडीसाठी वेळीच योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा हाच बटाटा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावणार आहे.
बटाट्याच्या लागवडीला कोरोनाचे ग्रहण ; शेतकऱ्यांनी फिरवली पाठ