ETV Bharat / state

इंदापूर तालुक्याच्या बोरी येथील द्राक्षांची परदेशात मागणी - द्राक्षांची परदेशात मागणी इंदापूर

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोरी, काझड, बिरगुंडी, लासुर्णे परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षबाग आहेत. बोरी गावात अडीच हजार एकरापेक्षा जास्त बागा आहेत. येथील संतोष धायगुडे यांच्याकडे २० एकरावर द्राक्ष बाग आहे. धायगुडे यांनी ३१ ऑगस्ट रोजी हंगामपूर्व छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील द्राक्ष साडेतीन ते चार महिन्यात परिपक्व झाली.

इंदापूर तालुक्यातील बोरी येथील द्राक्षांची परदेशात मागणी

author img

By

Published : Dec 31, 2020, 5:17 PM IST

बारामती (पुणे) - हंगामपूर्व छाटणी केलेल्या द्राक्षाला यावर्षी उच्चांकी दर मिळाला आहे. इंदापूर तालुक्यातील बोरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संतोष भानुदास धायगुडे यांच्या शेतीतील ही द्राक्षे आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोरी, काझड, बिरगुंडी, लासुर्णे परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षबाग आहेत. बोरी गावात अडीच हजार एकरापेक्षा जास्त बागा आहेत. येथील संतोष धायगुडे यांच्याकडे २० एकरावर द्राक्ष बाग आहे. धायगुडे यांनी ३१ ऑगस्ट रोजी हंगामपूर्व छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील द्राक्ष साडेतीन ते चार महिन्यात परिपक्व झाली.

द्राक्षांचे टपोरे घड
द्राक्षांचे टपोरे घड

शरद बिया विरहीत द्राक्षाच्या काळ्‍या वाणाचे एकरी उच्चांकी १२ टन उत्पादन मिळाले आहे. या द्राक्ष बागेतील मण्यांचा आकार मोठा असून, घडाचे वजन ८०० ते ९०० ग्रॅम असल्याने बागेतील ९० टक्के द्राक्षे डीजे निर्यात कंपनीच्या वतीने श्रीलंकेतील कोलंबो येथे पाठविण्यात येणार आहेत. निर्यातक्षम द्राक्षामुळे धायगुडे यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे.

द्राक्षांना परदेशात मागणी

बोरीतील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटावर मात करून द्राक्षाचे मळे फुलवले आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तोडणीस बोरीतील शेतकऱ्यांचे सेंद्रीय पद्धतीने द्राक्षांचे उत्पादन घेण्याकडे कल असल्यामुळे बोरीच्या द्राक्षांना परदेशामध्ये चांगली मागणी असून चीन, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, दुबई आदी देशांत द्राक्षाची निर्यात सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.