ETV Bharat / state

Deepak Mankar Reaction : अजित पवार मुख्यमंत्री व्हायला सक्षम; माजी उपमहापौर दीपक मानकर यांची प्रतिक्रिया

आज पुणे येथे झालेल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे पुणे शहरावरती अजित पवार गटाचे वर्चस्व सध्या तरी दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी उपमहापौर, दीपक मानकर यांनीसुद्धा अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची भूमिका जाहीर केली. शरद पवार यांनी अजित पवारांना आशीर्वाद द्यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

Pune News
माजी उपमहापौर दीपक मानकर
author img

By

Published : Jul 4, 2023, 8:39 PM IST

Updated : Jul 4, 2023, 9:41 PM IST

प्रतिक्रिया देताना दीपक मानकर

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी 9 आमदारांना सोबत घेऊन भाजप आणि शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत भूकंप केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी उपमहापौर, दीपक मानकर यांनीसुद्धा अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे.

शरद पवार यांनी पुन्हा एकदा विचार करावा : 83 व्या वर्षी जर शरद पवार हे तरुण म्हणून फिरत असतील तर, मग राजकीय महत्वकांक्षा असणे वाईट आहे का? त्यामुळे मुख्यमंत्री व्हायला मग 82 व्या वर्षीची अजित पवार यांनी वाट बघायची का? आम्ही अजित पवार यांचे समर्थन करत आहे. आजित पवार यांना शरद पवार यांनी संधी दिली पाहिजे. तसेच शरद पवार यांनी सुद्धा आशीर्वाद द्यावेत. पुणे शहरातले असंख्य नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा विचार करावा अशी सर्वांची भूमिका असल्याचे दीपक मानकर यांनी म्हटले आहे.

अजित पवार मुख्यमंत्री व्हायला सक्षम : अजित पवार यांना आतापर्यंत राष्ट्रवादीतील सर्वोच्च पद देण्यात आले अशी टीका, शरद पवार समर्थकडून होत असते. यावर दीपक मानकर म्हणाले की, अजित पवारांमध्ये ती कार्यक्षमता असल्यामुळे ते पदे दिले गेले. त्या पदाला पूर्ण न्याय देण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे आजही अजित पवार मुख्यमंत्री व्हायला सक्षम आहे. आज जो निर्णय घेतला आहे तो योग्य असल्याचे, तसेच उद्याच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या बैठकीला हजर राहणार असल्याचे, दीपक मानकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar Photo Permission : परवानगीशिवाय फोटो वापरू नका; शरद पवारांची थेट तंबी
  2. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडानंतर कोणाकडे किती आमदार?; वाचा सविस्तर
  3. Maharashtra Political Crisis : शरद पवार म्हणतील तेच आम्ही करणार- प्रशांत जगताप

Last Updated : Jul 4, 2023, 9:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.