ETV Bharat / state

पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या रशीदभाईंचा उपचारादरम्यान मृत्यू; जुन्नर तालुक्यातील घटना - उपचारादरम्यान मृत्यू

बुधवारी 14 मेच्या पहाटे दोन तरुणांनी जुना राग मनात धरून दुकानातून सिगारेट व आगपेटी खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानदाराला घराबाहेर बोलवले. त्यानंतर त्यांनी हात व पाय बांधून तोंडात बोळा घालून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये रशीदभाई 60 टक्के भाजले.

पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या रशीदभाईंचा उपचारादरम्यान मृत्यू; जुन्नर तालुक्यातील घटना
author img

By

Published : May 25, 2019, 7:54 PM IST

पुणे - जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मांजरवाडी येथे मागील 8 दिवसांपूर्वी दोन तरुणांनी मध्यरात्री 1 च्या सुमारास किरकोळ कारणावरून येथील दुकानदार रशीदभाई तांबोळी यांना पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिले होते. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मंचर ग्रामीण व खासगी रुग्णालयात उपचार करून पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, जखमा खोलवर असल्याने त्यांचा उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. आज दुपारी 1.45 वाजता त्यांचे निधन झाले.

पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिलेल्या रशीदभाईंचा उपचारादरम्यान मृत्यू; जुन्नर तालुक्यातील घटना

बुधवारी 14 मेच्या पहाटे दोन तरुणांनी जुना राग मनात धरून दुकानातून सिगारेट व आगपेटी खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानदाराला घराबाहेर बोलवले. त्यानंतर त्यांनी हात व पाय बांधून तोंडात बोळा घालून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये रशीदभाई 60 टक्के भाजले.

रशीदभाई यांचे किराणामालाचे दुकान असून पूर्वी ते मांजरवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणूनही काम पाहत होते. काही दिवसांपूर्वी रस्त्याचे काम सुरू होते. रस्ता कच्चा असतानाही शेजारी राहणारे ऋषीकेश लोखंडे आणि किरण जाधव यांनी त्यावरुन दुचाकी नेली. तेव्हा रशीदभाई आणि त्यांच्यात वाद झाला. नंतर तो सामंजस्याने मिटला खरा पण ऋषिकेश आणि किरणच्या डोक्यात सुडाची भावना होती. त्यातून हा प्रकार घडला आहे.

या घटनेची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याला रशीदभाई यांचा मुलगा शोएब तांबोळी यांनी दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ऋषिकेश पोपट लोखंडे व किरन कानिफनाथ जाधव या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील पुढील तपास करत आहेत.

ही घटना गावातील गावठाण हद्दीतच घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. पण, रशीदभाई यांच्या निधनाची बातमी आज दुपारी पंचक्रोशीत समजल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मांजरवाडी आणि खोडद ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून रशीदभाई यांना आदरांजली वाहिली.

Intro:Anc__पुणे जिल्ह्यातील
जुन्नर तालुक्यात मांजरवाडी येथे मागील 8 दिवसांपूर्वी दोन युवकांनी मध्यरात्री 1 च्या सुमारास किरकोळ कारणावरून येथील दुकानदार रशीदभाई तांबोळी याना पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिले होते यात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांच्यावर मंचर ग्रामीण व खासगी रुग्णालय उपचार करून, पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते,परंतु जखमा खोलवर असल्याने त्यांचा उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता .आज दुपारी 1.45 वाजता त्यांचे निधन झाले.

बुधवारी 14 मे च्या पहाटेे १ च्या सुमारास दोन तरुणांनी जुना राग मनात धरून दुकानातून सिगारेट व माचीस खरेदी करण्याचा बहाणा करून घरा बाहेर बोलुन हात व पाय बांधुन तोंडात बोळा घालुन अंगावर पेट्रोल टाकुन जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.यामध्ये रशीदभाई 60 टक्के भाजले होते.

रशीदभाई यांचं किराणामालाचं दुकान असून पूर्वी ते मांजरवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणूनही काम पाहत होते.काही दिवसांपूर्वी रस्त्याचं काम सुरु होतं.रस्ता कच्चा असतानाही शेजारी राहणारे हृषीकेश लोखंडे आणि किरण जाधव यांनी त्यावरुन दुचाकी नेली. तेव्हा रशीदभाई आणि त्यांच्यात वाद झाला. नंतर तो सामंजस्याने मिटला खरा पण हृषिकेश आणि किरणच्या डोक्यात सुडाची भावना होती.त्यातून हा प्रकार घडला.

सदर घटनेची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला रशीदभाई यांचा मुलगा शोएब तांबोळी यांनी दिली.या माहिती नंतर पोलीसानी घटनास्थळी येऊन पाहणी केली ऋषिकेश पोपट लोखंडे व किरण कानिफनाथ जाधव या दोन तरुणांनवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले होते. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील पुढील तपास करत आहेत.सदर घटना गावात गावठाण हद्दीतच घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते.पण रशीदभाई यांच्या निधनाची बातमी आज दुपारी जेव्हा पंचक्रोशीत समजली तेव्हा अनेकांनी हळहळ व्यक्त केली.मांजरवाडी आणि खोडद ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आदरांजली वाहिली.
Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.