ETV Bharat / state

'त्या' महिला कॉन्स्टेबलला नियमानुसार सर्व सहकार्याची ग्वाही; वरिष्ठांकडून त्रास होत असल्याची केली होती तक्रार - Ravindra Dhangekar

Pune Woman Police Constable story : पुण्यातील पोलीस खात्यात असणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलला आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन कर्तव्य करावं लागत आहे. तसंच वरिष्ठांकडून त्यांना त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. याबाबत आता डीसीपी स्मार्थना पाटील (DCP Smartana Patil) यांनी याची दखल घेतल्याचं स्पष्ट केलंय.

Pune Woman Police Constable story
महिला कॉन्स्टेबल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 4:44 PM IST

Updated : Dec 28, 2023, 5:39 PM IST

पुणे Pune Woman Police Constable story : पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग बाहेर बुधवारी शिक्षकांचा मोर्चा होता. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल बंदोबस्ताला होत्या. तेव्हा हातात 9 महिन्याचं लहान बाळ घेऊन त्या महिला कॉन्स्टेबल आपलं कर्तव्य बजावत होत्या. कर्तव्य बजावत असताना लहान मुलगा रडत होता. तेव्हा सेंट्रल बिल्डिंग येथे आपल्या कामानिमित्त आलेले आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ते दृष्य पाहिलं. त्यांनी महिला कॉन्स्टेबलची विचारपूस केली. त्यावेळी कॉन्स्टेबलने वरिष्ठ त्रास देत असल्याचं सांगितलं. आता या पोलीस मंगल सयाजी लाकडे यांना बोलावून त्यांची विचारपूस करून त्यांना याेग्य तो सल्ला दिल्याची माहिती डीसीपी पाटील यांनी दिलीय.

महिला कॉन्स्टेबलला वरिष्ठांनी दिला सल्ला : डीसीपी स्मार्थना पाटील (DCP Smartana Patil) म्हणाल्या की, त्या महिला पोलीस कर्माचाऱ्याचं रेकॉर्ड पाहता 145 दिवसाच्या रजा, 45 दिवसाच्या अर्जित रजा, 60 दिवसांची बालसंगोपनाची रजा त्यांनी घेतलेली आहे. तसंच त्या हजर झाल्यावर लगेच सुट्ट्या घेतल्या होत्या. बुधवारी त्या ड्युटीवर हजर झाल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे की, बाळालासोबत घेऊन मला पोलीस स्टेशनला काम करण्याची परवानगी देण्यात यावी. परंतु तशी परवानगी आम्ही देऊ शकत नाही. पोलीस खात्यात पाळणा घराच्या सोयी आहेत. पोलीस मुख्यालय येथे देखील याची सोय करण्यात आलेली आहे. ते तिथं मुलाला ठेवू शकतात. मी त्यांना हा पर्याय दिला आहे. तसंच जर त्यांना लांब पडत असेल तर त्यांची बदली मुख्यालय येथे करून देऊ तिथं त्यांना बाळाला पाळणाघरात ठेवता येईल. तसंच अजूनही त्यांच्या बाल संगोपनाच्या रजा शिल्लक असून त्या देखील त्या घेऊ शकतात. बाळाच्या दृष्टीने देखील पोलीस स्टेशन हे योग्य नसल्याचा सल्ला त्यांना बोलावून दिला असल्याचं यावेळी डीसीपी पाटील यांनी सांगितलं.

बाळाला सोबत घेऊन काम करण्याची परवानगी नाही : सध्या पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटचा प्रसार वाढत आहे. पोलीस स्टेशन येथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. पोलीस स्टेशन येथे काम करत असताना त्या बाळाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. बाळ अजूनही लहान आहे. तसंच त्यांना जर बाळाला सोबत घेऊन काम करण्याची परवानगी दिली तर त्या पोलीस स्टेशन येथे अजून 32 महिला कर्मचारी काम करत आहेत. त्यांना देखील मग परवानगी द्यावी लागेल. पोलीस खात्यातील ड्युटी ही अशी आहे की, अचानक कुठेही जावं लागतं आणि बुधवारी त्यांची पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी असताना अचानक मोर्चाच्या निमित्ताने त्यांना तिथं पाठवण्यात आलं होतं. तेव्हा वरिष्ठ पोलिसांना देखील हे माहीत नव्हत की, त्यांच्याबरोबर बाळ आहे. बाळाला सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये काम करायची परवानगी देण्यात येणार नाही. पोलीस खात्यात ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा असं देखील यावेळी पाटील म्हणाल्या.

नेमंक काय घडलं होतं : मंगल सयाजी लाकडे असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्या पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावत आहेत. याबाबत त्या म्हणाल्या, "29 नोव्हेंबर पासून 9 महिन्याच्या बाळाला घेऊन कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावत असताना वरिष्ठ अधिकारी जाणून बुजून त्रास देत आहेत. ड्युटीवर असताना देखील मी ड्युटीवर आहे की, नाही याची विचारपूस करतात. मला आंदोलने तसेच बाहेरच्या बंदोबस्तची ड्युटी दिली जाते. माझ्या मुलाला सोबत घेऊन मी काम करत आहे. माझ्या किरकोळ रजा, बाल संगोपन रजा शिल्लक असताना देखील दोन दिवसाची सुट्टी देण्यात आलेली नाही. तसंच येथे दुसरा व्यक्ती ड्युटीवर असताना देखील मला येथे पाठवण्यात आलं आहे. मला वरिष्ठांच्या कडून जाणूनबुजून त्रास दिला जात आहे". आता डीसीपींनी दखल घेतल्यानं त्यांची परवड थांबेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा -

  1. आईचा बाळासाठी संघर्ष; 9 महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन कर्तव्य बजावतेय 'ही' महिला पोलीस
  2. Threatened To Female Constable : पिस्तूल दाखवून महिला कॉन्स्टेबलकडे धमकावले ; अ‍ॅसिड हल्ल्याची, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
  3. Delhi Crime : दिल्ली महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येचा दोन वर्षानंतर उलगडा, तपासाकरिता पाठपुरावा करणारा 'तो' निघाला आरोप

Last Updated : Dec 28, 2023, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.