पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपाल यांनी केलं, यावरून राज्यात मोठा वादंग निर्माण झालेला आहे. विरोधी पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन केलं जातं आहे. राज्यपाल यांच्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, 'एक गोष्ट स्पष्ट आहे की, जोपर्यंत चंद्र, सूर्य, पृथ्वी आहे. तोपर्यत आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे असणार आहे. तसेच आमचे हिरो देखील छत्रपती शिवाजी महाराज राहणार (glorifying Chhatrapati Shivaji Maharaj) आहेत. यात काहीही शंका नाही. मला देखील वाटत नाही की, राज्यपाल यांच्या मनात देखील काही शंका असतील. राज्यपाल यांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात (tried to cover up Governor Koshyaris controversial statements) आले आहे. यावर वाद होण्याच कारण नाही, त्यामुळे राज्यपाल यांच पण तेच म्हणणं आहे, दुसरा वाद काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हेच राज्याचे आणि देशाचे आदर्श आहे, असं यावेळी फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले.
पुण्यात 71 व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमा ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपास्थित होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांना भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारलं असता. ते म्हणाले की, 'सुधांशू त्रिवेदी यांनी जे वक्तव्य केल आहे. ते मी नीट एकल आहे. कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली अस म्हटलेलं नाही,' असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.
राज्याचे पोलिस भरती वर फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, सगळ्यांच्या बादल्या हे होणार आहे. जे बदलीस प्रात्र
आहे. त्यांच्या बदल्या ही होणार आहे. जे प्राप्त नाही त्यांच्या होत नाही, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.