पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमुळे मागील अडीच वर्षे वाया गेली. आता आमच्यासोबत पुढील अडीच वर्षे उरली आहेत आणि आम्हाला खूप काम करायचे आहे. आमचे 'डबल हॉर्सपॉवर' सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व शक्तीनिशी काम करणार असल्याचे ते म्हणाले.
राहुल गांंधींवर टीका: भारत जोडो यात्रेवरून कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर त्यांनी टीका केली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींनी काश्मीरमध्ये जाऊन तिरंगा फडकवला. कॉंग्रेसच्या राजवटीत राहुल गांधी हे करू शकले नाहीत कारण हे तेव्हाच शक्य झाले जेव्हा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 रद्द केले. ते पुण्यात बोलत होते.
पंतप्रधानांचे केले कौतुक: यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्यांनी खऱ्या अर्थाने 370 कलम हटवून टाकल असे आपले नेते अमित शाह,राज्याचे मुख्यमंत्री आणि खऱ्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आज उपस्थित आहे.उशीर खूप झाला आहे आणि आपल्या सगळ्यांना अमित भाई यांना एकायच आहे.आपण सगळे सौभाग्य आहे की आपल्या मोदीजी यांचं नेतृत्व लाभलं.आज ते देशाचे पंतप्रधान म्हणून नव्हे तर विश्वाचे नेते आहे.गरीब कल्याणाचा विचार करून एक आत्मनिर्भर भारत निर्माण केली जगातील पाचवी अर्थव्यवस्था मोदीजी यांनी तयार केली. बहुजनांचा कल्याण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
कॉंग्रेसवर केली टीका: गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेल अनुभव घेऊन देशात काम करण्याची पद्धत बदलून टाकली. आपण सर्वांनी हे पुस्तक वाचव.राज्यात मी आणि शिंदे जी यांनी परिवर्तन सुरू केलं आहे.अडीच वर्ष वाया गेले आत्ता अडीच वर्ष आहे.आम्ही मोदीजी यांचं इंजन हातात घेऊन अडीच वर्षात जे झालं नाही ते आत्ता अडीच वर्षात करणार आहे.मोदीजी यांनी 370 कलम हटवल म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीर मध्ये जाऊन तिरंगा झेंडा फडकवला आहे. काँग्रेस काळात त्यांनी कधीही काश्मीर मध्ये जाऊन झेंडा फडकवला नाही, असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.