दौंड - दौंड तालुक्यात भीमा नदीतून अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपश्यावर दौंड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोटकांच्या साह्याने उडवून देण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक कोटी 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. तब्बल 12 तास ही कारवाई सुरू होती. या वाळू चोरीप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांनी ही कारवाई केली. त्यामुळे वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहेत.
दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी अवैध रीतीने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. यावरून पोलिसांनी एक पथक तयार करून भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
15 लाखाचा मुद्देमाल नष्ट-
काल रात्रीपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये सहा फायबर बोटी, तीन सेक्शन बोटी, असा 1 कोटी 15 लाखाचा मुद्देमाल दौंड पोलिसांनी नष्ट केला. दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्या टीमने भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या फायबर बोटी नष्ट केल्या आहेत.
यांच्यावर गुन्हा दाखल-
याप्रकरणी अनिल पोपट गिरीमकर, दादा झुंबर गिरीमकर, बबलू पांडुरंग इफते, दीपक सुरेश माने, महेश उर्फ पप्पु हनुमंत कोथिंबीरे, गणेश मोहन शेजाळ यांच्यावर दौंड पोलीस स्टेशन येथे वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई-
ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी सुहास धस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, हवालदार आसिफ शेख, पांडुरंग पवार, अण्णासाहेब देशमुख, अमोल गवळी, किरण राऊत, अमोल देवकाते, रवी काळे, किशोर वाघ, शैलेश रणशिंग आणि सहा होमगार्ड यांच्या टीमने केली आहे.
हेही वाचा- पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरमधील जवानाला वीरमरण, दिवाळीच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा