ETV Bharat / state

दौंडमधील व्यापाऱ्याकडे सापडला सात लाखांचा बेकायदा गुटखा व विदेशी सिगारेट

सात लाख रुपये किमतीचा गुटखा आणि सिगारेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कमलेश मुरली कृपलानी याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण) या कायद्यांतर्गत दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gutkha
जप्त केलेल्या गुटख्यासह पोलीस
author img

By

Published : Apr 20, 2021, 5:46 PM IST

दौंड (पुणे) - शहरातील एक व्यापारी गोदामात बेकायदा चोरून गुटका व विदेशी सिगारेट साठवण करून त्याची विक्री करत होता. या व्यापाऱ्याकडील तब्बल 7 लाख रुपये किंमतीचा माल दौंड पोलिसांनी जप्‍त करुन कारवाई केली आहे, अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली. ही कारवाई प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

बेकायदा गुटखा, विदेशी सिगारेटचा साठा -

कमलेश मुरली कृपलानी (रा. दौंड, भैरोबा मंदिराजवळ) असे या व्यापाराचे नाव आहे. याबाबत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांना माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून कारवाईसाठी तैनात केले. या पथकाने सोमवारी (दि. १९) कमलेश मुरली कृपलानी हा आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गाळ्यांमध्ये बेकायदा विनापरवाना गुटखा व विदेशी सिगारेट या मालाची साठवण करून त्याची आपल्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त -

कृपलानीच्या गाळ्यांमध्ये छापा घातला असता तेथे तब्बल सात लाख रुपये किमतीचा गुटखा आणि सिगारेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कमलेश मुरली कृपलानी याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण) या कायद्यांतर्गत दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करत आहेत.

कारवाई करणारे पथक -

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, विजय वाघमारे, अंमलदार शरद वारे, विशाल जावळे, किरण ढुके, जब्बार सय्यद, योगेश गोलांडे, आप्पा वाकळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.