ETV Bharat / state

दौंड पोलिसांची मदत ज्येष्ठ निराधारांना ठरतेय आधार - pune latest news

दौंड पोलिसांची मदत ज्येष्ठ निराधारांना आधार ठरत आहे. दौंड तालुक्यातील २५ ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही मदत पोहोच झाली आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Apr 24, 2021, 8:56 PM IST

पुणे (दौंड) - पोलीस एखाद्याचा शोध घेत थेट त्याच्यापर्यंत पोहोचले म्हणजे तो एखाद्या प्रकरणात सापडला असाच विचार केला जातो. सध्या दौंड पोलीस हे काही विशेष ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेण्यासाठी वाड्यावस्त्या पिंजून काढत आहे. मात्र, हा 'शोध' कोणावरही कारवाईसाठी केला जात नसून तो ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी केला जात आहे. दौंड तालुक्यातील २५ ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही मदत पोहोच झाली आहे, अशी माहिती पोलीस परिविक्षाधीन उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी दिली.

ज्येष्ठ निराधार व्यक्तींना मदत -

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये तसेच उपासमारीची वेळ येऊन म्हणून ज्येष्ठ निराधार नागरिकांना पोलिसांची मदत हा अभिनव उपक्रम दौंड पोलिसांनी सुरू केला आहे. या माध्यमातून दौंड येथील परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या वतीने ज्येष्ठ निराधारांना अन्नधान्यांच्या किटचे वाटप केले जात आहे. त्याचबरोबर सॅनिटायझर व मास्कचे वाटप सुरू केले आहे.

ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची संकल्पना -

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. या काळात ज्यांना कोणाचाच आधार नाही अशा ज्येष्ठ निराधार नागरिकांसाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन त्यांना लागणारी सर्व मदत करण्याची अभिनव संकल्पना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार दौंड पोलिसांनी मदतीचे कार्य सुरू केले आहे.

आतापर्यंत २५ ज्येष्ठ नागरिकांना मदत -

पोलीस पाटलांच्या सहकार्यांने दौंड तालुक्यातील ज्येष्ठ निराधार महिला व पुरूषांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे दौंड पोलिसांचे पथक थेट त्याच्यापर्यंत जाऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत आहे. त्यांचे अडीअडचणी जाणून घेत आहेत. कोरोना (टेस्ट) तपासणी, लस, औषधोपचार यासंदर्भातील समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर अन्नधान्याचे किटचे वाटप केले जात आहे. यामध्ये आत्तापर्यंत २५ ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही मदत पोहोच झाली आहे. अजून माहिती मिळेल तशी मदत केली जाणार आहे. या उपक्रमासाठी दौंड पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस स्टाफचे सहकार्य लाभत आहे. अशी माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.