पुणे- कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर ट्रस्टने मंगळवार (17 मार्च)पासून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घेण्याचे आवाहन देखील मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
कोरोनामुळ संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 100 पार झालेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत यापूर्वीच सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक देवस्थानांनी आपली मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. आता शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने देखील 17 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
हेही वाचा- पुण्यात बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या