पुणे- भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराची नोट चलनातून काढण्याचा आदेश जारी केल्यानंतर सराफ व्यावसायिक भलतेच खूश झाले आहेत. कारण, 2 हजाराची नोट बदलण्यासाठी ग्राहकांनी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम सराफा बाजारपेठेत सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे.
केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजारांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. मात्र, एकाचवेळी 20 हजारापर्यंतच नोटा बदलल्या जाणार आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार विक्रेते 2 हजारांची नोट घेण्यास नकार देऊ शकत नाहीत. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. पेट्रोल पंपसह इतर बाजारपेठांमध्ये दुकानदार, व्यावसायिकांसह विक्रेते 2 हजारांची नोट घेण्यास धजावत नाहीत. मात्र, सराफ व्यावसायिकांकडून 2 हजारांची नोट स्वीकारली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सोने खरेदीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. 2 हजार नोटबंदीच्या निर्णयानंतर सोने खरेदीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे..
सरकारच्या नियमाप्रमाणे व्यवहार सुरू-याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना अमराळे ज्वेलर्सचे मालक बाळासाहेब अमराळे म्हणाले, की ग्राहकांकडून सोने खरेदीचे प्रमाण हे सुरुवातीला नेहमीप्रमाणे होते. पण, 2 हजार नोट चलनातून मागे घेण्याच्या निर्णयानंतर आमच्या दुकानात सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. सरकारने नोट बदलून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याने नागरिकांमध्ये पूर्वीप्रमाणे भीती नाही. 2 हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्यात येणार असल्या तरी सप्टेंबरपर्यंत चलनात चालणार आहेत. त्यामुळेच आम्हा व्यावसियाकांना अडचण येणार नाही. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार 2 लाखापर्यंत रोखीने व्यवहार करत आहोत. सर्व नियमाप्रमाणे व्यवहार करत आहोत.
सध्या बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रती तोळा 61 हजार रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 58 हजार रुपयावर पोहोचला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 51 हजार 850 रुपये आहे. 2 हजाराच्या नोटा घेऊन जादा दराने सोने-चांदीची विक्री होत असल्याची अफवा आहे. नेहमीप्रमाणे बाजारभावाप्रमाणे सोने-चांदीची विक्री करत आहोत-सराफ व्यावसायिक स्वप्नील अमराळे
हेही वाचा
- Sanjay Raut On Narendra Modi : देशाच्या यंत्रणा सरकारच्या गुलाम म्हणून काम करतात, 2 हजारच्या नोटबंदीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
- Shirdi Sai Baba : दोन हजार रुपये नोटबंदीनंतर साई संस्थान अलर्ट; भाविकांना केले 'हे' आवाहन
- Note Printed Nashik Press : नाशिक प्रेसमध्ये 500 रुपयांच्या पाच हजार 200 दशलक्ष नोटा छापणार