ETV Bharat / state

संजीवन समाधी सोहळा दरम्यान आळंदीत संचारबंदी लागू

अलंकापुरीमध्ये आठ तारखेपासून संजीवन समाधी सोहळा सुरू होणार आहे. मात्र हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. संपूर्ण आळंदी शहर व परिसरात 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार
पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार
author img

By

Published : Dec 4, 2020, 9:59 PM IST

पुणे (आळंदी) - पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा 20 ते 50 वारकऱ्यांच्या उपस्थित पार पाडला जाणार असून आहे. या सोहळ्यादरम्यान आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली, असे पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी ईटीव्ही भारत बोलताना सांगितले. संत ज्ञानेश्वर माऊलींचा कार्तिकी वारीचा संजीवन समाधी सोहळा आळंदी मध्ये साजरा होत आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटात समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सोशल डिस्टंसिंग, माक्स वापरणे, सॅनिटायझर फवारणी, असे कोरोना काळातील नियम पाळले जाणार आहेत.

पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार
आळंदीत संचारबंदी लागू-

अलंकापुरीमध्ये आठ तारखेपासून संजीवन समाधी सोहळा सुरू होणार आहे. मात्र हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. संपूर्ण आळंदी शहर व परिसरात 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आळंदीत येणाऱ्या दिंडीवर बंदी ठेवण्यात आली असून आळंदीतील धर्मशाळा, हॉटेल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातून संजीवन समाधी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांनी आळंदीत न येता घरातूनच संजीवन समाधी सोहळ्यासाठी स्मरण करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पार यांनी केली आहे.

संजीवन समाधी सोहळा मर्यादित-

आळंदीमध्ये साजरा होणारा कार्तिकवारीचा संजीवन समाधी सोहळा कोरोना महामारीच्या संकटामुळे साधेपणात साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. तसेच कोरोना काळातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. संजीवन समाधी सोहळा विधी परंपरेनुसार साजरा केला जाणार आहे. मात्र या सोहळ्यादरम्यान मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित कोरोनाचे नियम पाळूनच साजरा केला जाणार आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र कोरोना अपडेट : ५,२२९ नवीन रुग्णांचे निदान, १२७ रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा- काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार कोरोना लस - पंतप्रधान मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.