ETV Bharat / state

World Environment Day : वीज उपकेंद्रात यंत्रचालकांनी फुलवली वनराई - environment news

बारामती औद्योगिक वसाहतीमधील महावितरणच्या ‘एमआयडीसी-२’ (baramati midc) या वीज उपकेंद्रातील यंत्रचालकांनी गेल्या ११ वर्षांपासून लावलेली झाडे जोपासण्याचे केले काम. गेल्या ११ वर्षांपासून त्यांनी लावलेली झाडे जोपासण्याचे काम केले आहे. (The importance of trees) इथे मिश्र प्रकारची शंभराहून अधिक झाडे आहेत.

cultivating trees
cultivating trees
author img

By

Published : Jun 5, 2022, 1:39 PM IST

बारामती : दरवर्षीचा उन्हाळा झाडांचे महत्व अधोरेखित करतो.(Significance of trees in summer) ‘झाडे लावा…’ च्या घोषणा देऊन किंवा पोस्ट शेअर करुन झाडे येणार नाहीत. तर लावलेले झाडे किंवा निसर्गत: उगवून आलेले झाड जोपासण्याची आज गरज आहे. असेच काहीसे काम बारामती औद्योगिक वसाहतीमधील महावितरणच्या ‘एमआयडीसी-२’ या वीज उपकेंद्रातील यंत्रचालकांनी (ऑपरेटर) केले आहे. गेल्या ११ वर्षांपासून त्यांनी लावलेली झाडे जोपासण्याचे काम केले आहे. (The importance of trees) इथे मिश्र प्रकारची शंभराहून अधिक झाडे आहेत.

शंभराहून अधिक झाडांची लागवड : वीज उपकेंद्रात किंवा वीज वाहिन्यांच्या लगत झाडे लावण्याला अनेक मर्यादा आहेत. (Environment Programme) तरीही बारामती एमआयडीसी-२ उपकेंद्रात रिकाम्या जागेचा सदुपयोग यंत्रचालकांनी केला आहे. २०११ साली या उपकेंद्राचे नूतनीकरण झाले. त्यावेळी ज्या मान्यवरांनी ही झाडे लावली. त्याची क्रमांकासह यादी उपकेंद्रात उपलब्ध आहे.

झाडांमुळे उपकेंद्रातील वातावरण प्रसन्न : उपकेंद्राच्या यार्डाबाहेरील रिकाम्या जागेत. संरक्षक भिंतीलगत ३ रांगेत ही झाडे लावून त्यांना ठिबक सिंचनाची सोय केली आहे. झाडे लावताना आंबा, चिकू, उंबर, बेल, कडूलिंब, करंजे, सुबाभूळसह काही वनीकरणामार्फत मिळालेली झाडेही लावली आहेत. झाडांमुळे उपकेंद्रातील वातावरण प्रसन्न असते. शिवाय येणाऱ्या अभ्यांगतांना व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हक्काची सावली मिळाली.

या कामी तत्कालिन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांनी पुढाकार घेतला. आतापर्यंत सचिन बनकर, सुनील गौंड, अमोल चांगण या शाखा अभियंत्यांनीही ही झाडे जगविण्यासाठी मदत केली. तर प्रत्यक्षात यंत्रचालक अनिल केसकर, गजानन नळेगावकर, नितीन सूर्यवंशी, मच्छिंद्र लडकत, अनिल गाडे यांचेसह धनासिंग चांदगुडे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी झाडे जगविण्याचे काम केले. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा- World Environment Day 2022: जागतिक पर्यावरण दिन; वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.