ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी; ऑनलाइन नोंदणी न केलेलेही दाखल - Ambegaon latest news

१८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी १ मे पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लसीकरणासाठी नाव नोंदणी झाल्यानंतर येणाऱ्या पुढील संदेशाची (लसीकरण तारीख) वाट न बघताच लसीकरण केंद्रावर लोकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली.

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी
कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी
author img

By

Published : May 2, 2021, 9:30 AM IST

पुणे - जिल्ह्यातील मंचर ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी १ मे पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी झटपट 'कोविन'वर नाव नोंदवत लसीकरण केंद्रावर धाव घेतल्याचे चित्र बघायला मिळाले. मात्र, नाव नोंदणी झाल्यानंतर येणाऱ्या पुढील संदेशाची (लसीकरण तारीख) वाट न बघताच लसीकरण केंद्रावर लोकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली.

राज्यात शनिवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पण अनेक लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशीच परिस्थिती उत्तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खेड, प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर, प्राथमिक आरोग्य केंद्र शिक्रापूर आणि उपजिल्हा रुग्णालय मंचर या रुग्णालयाबाहेर दिसून आली. ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे. अशांना नियमानुसार कोविन या अँपच्या माध्यमातून ऑनलाइन नाव रजिस्टर करावे लागत आहे. त्याप्रमाणे नोंदणीही केली जात आहे. मात्र नाव नोंदणी होताच पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. यात काही नाव नोंदणी न करताच लस घेण्यासाठी दाखल1 होते.

आमचा नंबर घ्या-

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यात अनेक नागरिक नाव रजिस्टर करूनच लस घेण्यासाठी आले होते. तारीख देण्यात आली नाही, असं सांगत नागरिकांनी सकाळपासून लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केली. 'नाव रजिस्टर झालंय, तारीख सांगितली नाही. आमचा नंबर घ्या, अशा विनवण्या करताना लोक दिसले. त्यामुळे अनेक प्रश्नांचा सामना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना करावा लागला.

ज्या नागरिकांचे ऑनलाईन रजिस्टर झाले असेल आणि ज्यांना आजची तारीख दिली आहे. अशा नागरिकांनाच लस दिली जाणार असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र नागरिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. अखेर नाराज होऊन अनेक नागरिकांनी घरी जाणे पसंत केले. मात्र या किचकट प्रक्रियांमुळे नागरिकांनी सरकार व प्रशासनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.