ETV Bharat / state

शेतामध्ये ड्रोनद्वारे होतेय औषध फवारणी; शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड

शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली कि त्यातून वेळ, पैसा, मेहनतीची बचत होते. अशाच प्रकारचे नवे तंत्रज्ञान आता शेताच्या बांधावर आले आहे. ड्रोनचा वापर विविध कामांसाठी केला जात असताना शेतकरीही आता आपल्या शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर करू लागला आहे.

pune

author img

By

Published : Jan 12, 2020, 9:36 AM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे शेतात ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जात आहे. ड्रोनद्वारे फवारणीची शेतामध्ये औषध फवारणीची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. नाशिक येथील एका कंपनीने शेतामध्ये ड्रोनद्वारे औषध फवारणीचा हा प्रयोग केला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी ही हायटेक फवारणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

शेतामध्ये ड्रोनद्वारे होतेय औषध फवारणी; शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड

हेही वाचा - पुणे मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी, सुमारे 500 मीटर धावली मेट्रो!

शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली कि त्यातून वेळ, पैसा, मेहनतीची बचत होते. अशाच प्रकारचे नवे तंत्रज्ञान आता शेताच्या बांधावर आले आहे. ड्रोनचा वापर विविध कामांसाठी केला जात असताना शेतकरीही आता आपल्या शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर करू लागला आहे.

हेही वाचा - पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारेंची बिनविरोध

कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमी पैशात या ड्रोनद्वारे फवारणी केली जाते. या नव्या तंत्रज्ञानामुळे ऊस, कांदा,फ्लॉवर, पालेभाज्या, डाळिंब या पिकांवर अगदी काही मिनिटांत फवारणी होत आहे. याशिवाय सूक्ष्म पद्धतीने पिकावर सर्वत्र फवारणी होत असल्याने याचा चांगलाच फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 10 लिटर क्षमता असलेल्या या ड्रोनमधून एकाचवेळी एकसारखी फवारणी होते. फवारणीसाठी शेतकऱ्यांकडून एकरी 800 रुपये घेतले जातात. आता हीच फवारणी मजुरांकडून करून घेतल्यास तेवढाच खर्च येतो पण वेळ जास्त लागतो शिवाय फवारणी एकसारखी होत नाही. परंतू या तंत्रज्ञानामुळे काही मिनिटात फवारणी पूर्ण होते.

हेही वाचा - कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर जाण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

शेतकरी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन प्रगत शेतीकडे वाटचाल करु लागला आहे. त्यामुळे त्याचा वेळ, पैसा, मेहनत वाचवून चांगले उत्पादन मिळण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये या ड्रोन फवारणीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

Intro:Anc_शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली कि त्यातुन वेळ,पैसा,मेहनतीची बचत होते असंच तंत्रज्ञान आता शेताच्या बांधावर आलय ड्रोनचा वापर अनेक वेळा विविध कामांसाठी केला जात असताना बळीराजाही आता आपल्या शेतात फवारणी साठी ड्रोन वापरू लागला आहे.चला पहावुयात काय आहे काय आहे हे नवीन तंत्रज्ञान...

Vo__ जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक परिसरात मागच्या 8 दिवसांपासून शेतात ड्रोन द्वारे फवारणी करणाऱ्या यंत्राची चांगलीच चर्चा रंगलीये.नाशिक येथील एका कंपनीने हा प्रयोग हाती घेतलाय.आणि परिसरातील शेतकरी हे हायटेक फवारणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

Byte_निलेश पवार,तंत्रज्ञ -ऍग्रोमाइल्स

vo__कमी वेळेत, कमी श्रमात,आणि कमी पैशात या ड्रोन द्वारे फवारणी केली जाते, ऊस,कांदा,फ्लॉवर,पालेभाज्या,डाळिंब आदी पिकावर अगदी काही मिनिटात फवारणी होत आहे याशिवाय सूक्ष्म पद्धतीने पिकावर सर्वत्र फवारणी होत असल्याने याचा चांगलाच फायदा होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

Byte_विकास मोरे,शेतकरी

vo_ एका वेळी १० लिटर क्षमता असलेल्या या ड्रोन मधून एकसारखी फवारणी होते.एकरी ८०० रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात.आता हीच फवारणी मजुरांकडून करून घेतल्यास तेवढाच खर्च येतो पण वेळ जास्त लागतो आणि फवारणी एकसारखी होत नाही. याशिवाय शेतात थेट मजुरांचा वावर वाढल्याने नाजूक पिकं पायाखाली तुडवले जाऊन नुकसानही होते. या तंत्रज्ञानामुळे काही मिनिटात फवारणी पूर्ण होते.

Byte_ऋषिकेश मुठे,शेतकरी

End vo_शेतकरी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन प्रगत शेतीकडे वाटचाल करु लागलाय त्यामुळे त्याचा वेळ, पैसा,मेहनत वाचुन चांगलं उत्पादन मिळण्यासाठी मदत होत आहे त्यामुळे पुढील काळामध्ये हि ड्रोन फवारणीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे हे मात्र नक्की... रोहिदास गाडगे Etv भारत जुन्नर पुणेBody:रेडी टु युझ पँकेज स्टोरी...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.