पुणे : राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या सुफा या दहशतवादी टोळीशी संबंधित दोघांना पुणे पोलिसांनी पकडले (Terrorists Arrest Case Pune) होते. या दोन्ही 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांनी अटक केली होती. एटीएसकडून या दोन्ही दहशतवाद्यांच्या करण्यात आलेल्या तपासणीमध्ये त्यांच्याकडे सापडलेल्या लॅपटॉप, मोबाईलमधून जवळपास 500 जीबीचा डेटा सापडला आहे. तर या दोघांकडून कुलाब्यातील छाबड हाऊसची रेकी करण्यात आली (Pune Police) असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ऑफ द रेकॉर्ड दिली (ATS on Terrorists Arrest) आहे.
ते दहशतवादी 'आयएसआयएस' प्रेरित : पुणे पोलिसांनी इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी या दोघांना कोथरूड येथून अटक केली होती. 30 मार्च 2022 रोजी राजस्थान पोलिसांनी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमस पुत्र बशीर खां शेरानी याला पकडले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआए) या संदर्भात गुन्हा दाखल करून अनेकांना अटक केली होती; मात्र तेव्हापासून युनूस साकी, इमरान आणि फिरोज पठान हे तिघे फरार होते. 'आयएसआयएस' पासून प्रेरणा घेऊन ही संघटना काम करत आहे. यातील इमरान खान आणि युनूस साकी याला अटक केली आहे तर फिरोज पठाण हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
बॉम्ब बनवण्याचे सर्किट सापडले : 'एटीएस'च्या तपासात या दोन्ही इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी यांच्याकडून छबाड हाऊसचे फोटो सापडले आहे. तसेच त्यांच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये सापडलेले गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणे सापडली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्या दोघांकडून ड्रोनसह बॉम्ब बनवण्याचे सर्किट सापडले असल्याची माहिती 'एटीएस'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच हे दोघे विविध प्रकारचे पुस्तके वाचून, युट्यूबचे व्हिडिओ पाहून प्रेरित झाले होते. तिसऱ्या फरार दहशतवाद्याचा शोध अद्याप सुरू आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.
फरार दहशतवाद्यांचा शोध सुरू : आतापर्यंत एटीएसने 4 जणांना पकडले आहे आणि राज्यात तसेच परराज्यात दहशतवाद विरोधी पथकाकडून फरार दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. विविध पथके देखील तयार करून विविध राज्यात पाठवण्यात आली आहेत. ज्या तिसऱ्या आरोपीला पकडण्यात आले आहे त्याने या दोघांना आश्रय दिला होता. तर रत्नागिरी मधून अटक केलेल्या व्यक्तीने त्यांना आर्थिक मदत केली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा: