ETV Bharat / state

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलं झाली 'सैराट'...नऊ महिन्यांत 219 जणांनी ठोकली धूम! - बेपत्ता व्यक्ती बातम्या

प्रेमासाठी 'सैराट' झालेली अल्पवयीन मुले-मुली घरातून पळून जातात. मात्र, याचा मनस्ताप कुटुंबाला सहन करावा लागतो. तसेच पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात. यावर 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट...

pimpri chinchwad police
पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलं झाली 'सैराट'...नऊ महिन्यांत 219 जणांनी ठोकली धूम!
author img

By

Published : Oct 23, 2020, 1:03 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील अल्पवयीन मुलं आणि मुली प्रेम प्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण गेल्या नऊ महिन्यात कमालीचं वाढलंय. यासंबंधी आकडेवारी समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या नऊ महिन्यात प्रेम प्रकरणातून आणि लग्नाचे अमिश दाखवून 219 जणांनी धूम ठोकली आहे. यातील 146 जण परत आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बहुतांश मुलं-मुली घरात परत येतात. मात्र, त्यांची माहिती पालक पोलिसांना देत नाहीत. त्यामुळे हा आकडा जास्त दिसत असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले, परंतु खरंच त्यांचं अपहरण झालं असेल, तर ऑपरेशन 'मुस्कान'च्या माध्यमातून त्यांचा शोध घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलं झाली 'सैराट'...नऊ महिन्यांत 219 जणांनी ठोकली धूम!
प्रेमासाठी 'सैराट' झालेली अल्पवयीन मुले-मुली घरातून पळून जातात. मात्र, याचा मनस्ताप कुटुंबाला सहन कारावा लागतो. तसेच पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे आई-वडील हतबल झाल्याचे पहायला मिळतात. परंतु शिक्षण आणि योग्य दिशा देणारी स्वप्नं बघण्याच्या वयात ही मुले-मुली पळून गेल्याचे गुन्हे दाखल होत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत शहरातील 219 मुलं-मुली प्रेम प्रकरणातून आणि लग्नाची फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी दीडशेच्या जवळपास मुले परत घरी आली आहेत. मुलं वयात येतात त्यावेळी त्यांना योग्य लैंगिक शिक्षणाविषयी माहिती असणे गरजेचे असते. तसेच त्यांच्या हालचालींवर कुटुंबातील व्यक्तींनी लक्षण ठेवावं. आई आणि वडील दोघे कामात व्यग्र असल्याने मुलांकडे जास्त लक्ष दिले जात नाही. यातूनच ही प्रकरणं घडतात; आणि मुलींना लग्नाची भूरळ घालण्यात येते, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

अशा वेळी पालकांनी मुलांना समजावून सांगणे अत्यंत म्हत्त्वाचे असते. सोशल मीडियावर आपली मुले काय पाहतात, ते वेगळ्या दिशेने तर जात नाहीत ना. याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. घरातील वातावरण देखील त्यांच्या पळून जाण्यास कारणीभूत ठरू शकते असे कायदे तज्ज्ञांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.