ETV Bharat / state

सोरतापवाडीत एक गावठी पिस्तुलसह काडतूस जप्त

author img

By

Published : Jan 24, 2021, 11:40 AM IST

हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर एका तरुणाकडून गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे.

Country made pistols seized in Pune district
सोरतापवाडी येथून एक गावठी पिस्तुलसह काडतूस जप्त

दौंड (पुणे) - हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर एका तरुणाकडून गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केली.

गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पुणे-सोलापूर रोडने पेट्रोलिंग करीत होती. यावेळी त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. यानुसार लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सोरतापवाडी, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे समोर येथे एक तरुण संशयास्पदरित्या आढळून आला. या युवकाची झडती घेतली असता, पोलिसांना विनापरवाना व बेकायदेशीर कमरेला बाळगलेले एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस आढळून आले. तसेच मोबाईलसह एकूण ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल सदर तरुणाकडून हस्तगत करण्यात आला आहे.

सदर तरुणाचे नाव महमद अलीहुसेन खान (वय १९ रा. सोरतापवाडी, इंडीयन ऑईल पेट्रोल पंपाचे मागे, ता. हवेली जि. पुणे ) (मूळ रा. पुरेखुदावन्द, रस्तामऊ, पोस्ट मंगरौली, जि.अमेटी, रा. उत्तर प्रदेश ) आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कामगिरी करणारे पथक
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अक्षय जावळे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.