पुणे - शहरात गेल्या आठ दिवसात दररोज सापडणाऱ्या नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सध्या शहरात १३१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर पुण्यात शहरात बाधितांची संख्या ही ४ लाख ६४ हजार ७६ इतकी झाली आहे. सध्या पुण्यात १३ हजार ४७९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७९२८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ४ लाख ४२ हजार ६६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या आठ दिवसापासून शहरात सरासरी १३ ते ११ हजार दरम्यान नमुन्यांची (स्वॅब) तपासणी केली जात आहे.
हेही वाचा - 'कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी राज्यात टास्क फोर्सची निर्मिती करणारे देशातील पहिले राज्य'
पुणे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या ९ लाख ९२ हजार ६७१ इतकी झाली आहे. तर त्यातील ९ लाख २२ हजार ७५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ११ हजार १५ इतकी आहे. तर इतर कारणांनी ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५८ हजार ८४० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे.
पुणे शहरातील रुग्णांची आकडेवारी -
- १५ मे - १६९३
- १६ मे - १३१७
- १७ मे - ६८४
- १८ मे - १०२१
- १९ मे - ११६४
- २० मे - ९३१
- २१ मे - ९७३
हेही वाचा - उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत आघाडी सरकार उदासीन