ETV Bharat / state

शेतीसोबत जोडव्यवसायही संकटात; शेतकऱ्यांवर फुले फेकून देण्याची वेळ - flower farming in pune

लॉकडाऊननंतर फुलांना मार्केट नसल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत असून ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका शेतीला बसला आहे.

corona affects pune agriculture
लॉकडाऊननंतर फुलांना मार्केट नसल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत असून ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
author img

By

Published : Mar 31, 2020, 7:42 PM IST

पुणे - लॉकडाऊननंतर फुलांना मार्केट नसल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत असून ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका शेतीला बसला आहे. शेतीसोबतच जोडधंद्यांनादेखील याची झळ बसल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.

लॉकडाऊननंतर फुलांना मार्केट नसल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान होत असून ती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जोडव्यवसाय करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाच्या जोडीने बँकांचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस उभारले. या ठिकाणी विविध जाती व रंगांच्या फुलांचे उत्पादन सुरू करण्यात आले. काही दिवसांत या फुलांची देशविदेशात मोठी मागणी वाढली; आणि नफा मिळवण्याचे दिवस समोर येत असताना कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन झाल्याने फुलांची बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या लग्न, जत्रा, मंदिरे, धार्मिक कार्यक्रम या सर्वांवर बंदी असल्याने फुलांची मागणी घटली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असल्याने निर्यातदेखील खोळंबली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेली विविध जातीची फुले झाडावर खराब होत आहेत. तसेच मजूर काम करत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडलीय. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानाची नोंद घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.