ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर, पुणे पालिका आयुक्तांची माहिती - पुणे महापालिका बातमी

शहरात कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता शहरात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना आजपासून (मंगळवार) महापालिकेतही बंद करण्यात आले आहे. तसेच कोरोनासंसर्ग झालेल्या रुग्णांबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ईटीव्ही भारतशी बातचित केली.

महापालिका आयुक्तांची माहिती
महापालिका आयुक्तांची माहिती
author img

By

Published : Mar 17, 2020, 4:44 PM IST

Updated : Mar 17, 2020, 5:15 PM IST

पुणे - शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना आजपासून (मंगळवार) महापालिकेतही बंद करण्यात आले आहे. तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गायकवाड यांनी माहिती दिली.

कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर, पुणे पालिका आयुक्तांची माहिती

कोरोनाबाधितांची संख्या शहरात वाढत असून त्याला रोखण्यासाठी शासन विविध योजना आखत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांनुसार त्यांना वेगवेगळे करण्यात येत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जात आहे. यासोबतच ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागातील एक किमी अंतरावरील लोकांचे महापालिकेकडून सर्व्हेक्षण केले जात आहे.

हेही वाचा - Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये कलम 144 लागू

महापालिकेत एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली असून त्यातून नागरिकांना माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. पुणे महापालिकेच्या रुग्णालयातील कोरोना विषाणूने बाधित असणाऱ्या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. जगभरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये जी लक्षणे आहेत ती पुण्यातील रुग्णांमध्ये अजून तरी दिसली नाही, ही एक सकारात्मक बाजू असल्याचे ते म्हणाले. यासोबतच नागरिकांनी कोरोनाला घाबरुन न जाता येणाऱ्या परिस्थितीचा सामना करा. बाहेरुन घरी आल्यानंतर स्वच्छ हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि कोरोनाला दूर ठेवा, असे आवाहनही महापालिका आयुक्तांनी केले आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट: श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर बंद

Last Updated : Mar 17, 2020, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.