ETV Bharat / state

Gopal Tiwari On Akashvani : आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या निर्णयावर काँग्रेसची नाराजी

प्रसार भारतीने आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग १९ जून रोजी बंद होत आहे. त्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Akashvani
Akashvani
author img

By

Published : Jun 15, 2023, 6:55 PM IST

काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची प्रतिक्रिया

पुणे : सरकारने आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे वृत्त विभागाची जबाबदारी आता औरंगाबाद येथील आकाशवाणी केंद्रांवर सोपवण्यात येणार आहे. पुण्यातील वृत्त विभागच बंद पडत असेल, तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत बातम्या कशा पाठवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांना देशांच्या जनतेसोबत बोलण्यासाठी मन की बात करावी लागते. मात्र, ज्या माध्यामातून पंतप्रधानांचा कार्यक्रम प्रसारीत केला जातो ते माध्यमच बंद करण्यात येत आहे. मोदी सरकारला नऊ वर्षात काही करता आले नाही मात्र, सरकार स्वायत्त संस्थेवर गदा आणत आहे अशी टीका तीवारी यांनी केली आहे.

जनतेच्या हितासाठी या बातम्या जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मात्र, मोदी सरकार सगळ्या स्वायत्त संस्थेवर गदा आणत आहे. अवघ्या नऊ वर्षात सरकारला याशिवाय काही करता आले नाही. या राज्यातले प्रोजेक्ट गुजरातला पळवण्याशिवाय दुसरे कोणते काम सरकारने केले - गोपाळ तिवारी, काँग्रेस प्रवक्ते

प्रादेशिक वृत्त विभाग 19 जून रोजी बंद : केंद्रीय प्रसार भारती धोरणात्मक निर्णय घेत असल्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग 19 जून रोजी बंद होत आहे. आता या विभागाचे काम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित केले जाईल, असे आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी सांगितले. आकाशवाणी पुणे केंद्रातून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पहिले बातमीपत्र सादर केले जाते. त्यानंतर आठ वाजून ५८ मिनिटांनी तसेच अकरा वाजून ५८ मिनिटांनी, तसेच सायंकाळी सहा वाजून ५८ मिनिटांनी बातमीपत्रे सादर केली जातात. आता प्रसार भारतीने पुण्यातील सर्व कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधीपासून हालचाल : पुणे वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली आधीच सुरू होत्या. याआधी पुण्यातील भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांची दोन पदे अन्य केंद्रांवर हलविण्यात आली होती. त्याचवेळी, याबद्दल अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर निर्णय घेण्यात आला. पुणे विभागाचे वृत्तविभाग अन्यत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आता नवा आदेश आला असून हा विभाग आता कायमचा बंद करण्यात आला आहे.

पुणे केंद्रात सर्वाधिक श्रोते : आकाशवाणी पुण्याचे केंद्र आणि श्रोते यांचे घट्ट नाते आहे. आकाशवाणीचे लहानांपासून वृद्धांपर्यंत चाहते आहेत. 80-90 च्या दशकात जन्मलेल्यांसाठी आकाशवाणी हा सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळेच आकाशवाणीच्या देशातील विविध स्थानकांपैकी पुणे स्थानकाला सर्वाधिक श्रोते लाभले होते. पुणे आकाशवाणी केंद्राच्या श्रोत्यांची संख्या जवळपास २४ लाख आहे.

आकाशवाणी, विश्वासाची हमी : आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना स्वातंत्र्यानंतर ५-६ वर्षांनी म्हणजे १९५३ मध्ये झाली. गेली ४० वर्षे या केंद्रातून नियमित वार्तापत्रे प्रसारित केली जात होती. आजही आकाशवाणीच्या बातम्यावर श्रोत्यांचा विश्वास कायम टिकून आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.