ETV Bharat / state

Kasba ByPoll : कसबा पोटनिवडणूक; भाजप नेत्याची काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण, बिडकरांनी आरोप फेटाळले - Congress alleged that BJP

भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने कसबा पोटनिवडणूकीत केला आहे. तर मी मारहाण केली नाही, कॉंग्रेसकडून खोटे आरोप केले जात असल्याचे गणेश बिडकर यांनी सांगितले.

Kasba ByPoll
काँग्रेस कार्यकर्ते
author img

By

Published : Feb 26, 2023, 5:49 PM IST

Updated : Feb 26, 2023, 7:19 PM IST

कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे

पुणे: कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरवात झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान झाले. कसबा पोटनिवडणूकीत दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात येत आहे की भारतीय जनता पक्ष मतदारांना पैसे वाटत आहे. तर दुसरीकडे भाजप देखील महाविकास आघाडीवर आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यातील मालधक्का चौक येथे भाजपचे नेते गणेश बिडकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. तर मी मारहाण केली नाही, कॉंग्रेसकडून खोटे आरोप केले जात असल्याचे गणेश बिडकर यांनी सांगितले.

कॉंग्रेसने केला मारहाणीचा आरोप: आज दुपारच्या सुमारास भाजपचे नेते गणेश बिडकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मालधक्का चौक येथे पैसे वाटत होते. यावेळी काँग्रसचे कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. तेव्हा बिडकर यांनी आमच्यावर हल्ला करत आम्हाला मारहाण केली आहे. बिडकर हे जेव्हा मारहाण करत होते तेव्हा तिथे पोलीस कर्मचारी हे देखील उपस्थित होते. आणि त्यांच्या समोर हा प्रकार घडला आहे. आमची मागणी आहे की बिडकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक: कसबा मतदार संघातील माल धक्का चौकातील अशोक कॅाम्प्लेक्स येथे ही घटना घडली आहे. गणेश बीडकर भाजप कार्यकर्त्यांसह याठीकाणी पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मारहाणीनंतर कॅाग्रेस कार्यकर्ते हे समर्थ पोलीस स्टेशनला जमले होते आणि यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे देखील समर्थ पोलीस स्टेशनला आले होते. जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथेच बसणार असल्याचे, यावेळी मोहन जोशी यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे आरोप खोटे: यावर प्रतिक्रिया देताना गणेश बिडकर म्हणाले की, आमचे कार्यकर्ते हे एका कार्यकर्त्याच्या घरी बसले होते. तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते हे तिथे आले आणि त्यांनी दमदाटी केली. कार्यकर्त्यांची भांडणे सुरू आहे म्हणून मी मध्ये गेलो आणि भांडण सोडवले. पण माझीच व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्यात आली आहे. काँग्रेसकडून जे आरोप करण्यात येत आहे त्यात कोणतेही तथ्य नसून मारहाणीची संस्कृती आमची नाही. ही संस्कृती काँगेसचीच आहे. उलट त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केली असून मी 6 वाजेनंतर पोलिसात तक्रार दाखल करणार आहे, असे देखील यावेळी बिडकर म्हणाले.

पोटनिवडणूकीच्या मतदानात गर्दी: कसबा पेठ विधानसभा मतदार संघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरूवात झालेली आहे. कसबा मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार संख्या आहे. पुण्यातील २७० मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. दरम्यान २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहेत. कसबा पोटनिवडणूकीच्या मतदानासाठी प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. आज सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिक हे मतदानाला आले आहेत. विविध बूथवर सकाळपासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक सकाळच्या वेळेतच मतदान करत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला: कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रचार केला आहे. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतल्याचे दिसून आले होते. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. आज बंदोबस्तासाठी 600 पोलीस कर्मचारी व 83 अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: Kasba By Election: बाप्पाचा मलाच आशीर्वाद.. जास्तीत जास्त मतधिक्याने निवडून येणार- हेमंत रासने

Last Updated : Feb 26, 2023, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.