ETV Bharat / state

यवतमध्ये अर्णब गोस्वामींच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन - Pune District Latest News

दौंड तालुक्यातील यवत येथे आज दौंड तालुका काँग्रेसच्या वतीने अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच अर्णब यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

यवतमध्ये अर्णब गोस्वामींच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

author img

By

Published : Jan 22, 2021, 10:50 PM IST

दौंड - दौंड तालुक्यातील यवत येथे आज दौंड तालुका काँग्रेसच्या वतीने अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच अर्णब यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पुलवामा येथे हल्ला होणार असल्याची माहिती कशी मिळाली? या हल्ल्यात कोण कोण सामील आहे याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वप्नील सोनवणे, मोहसीन तांबोळी, अल्ताफ शेख, संपत फडके, रफिकभाई शेख, अरविंद दोरगे, इस्माईलभाई पठाण, मालनताई दोरगे, सलमाताई शेख, लक्ष्मण दोरगे आदी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.