ETV Bharat / state

कोरोना तपासणीवरुन वाद; पतीवर धारदार शस्त्राने हल्ला - corona test

पिंपरीहून बारामतीत आलेल्या पत्नीला वैद्यकीय तपासणी करुन घे, असे पतीने सांगितले. या कारणावरुन पती-पत्नीत वाद झाला.

conflict between husband and wife
कोरोना तपासणीवरून वाद; पत्नीने केला पतीवर धारदार शस्त्राने हल्ला
author img

By

Published : Mar 28, 2020, 9:31 PM IST

बारामती (पुणे) - पुण्यावरून आलेल्या पत्नीला कोरोनाची तपासणी करण्यास सांगितल्यावरुन पतीवर लोंखडी विळ्याने हल्ला चढवणाऱ्या पत्नीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक औंदुबर पाटील यांनी दिली.

पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत प्रकरणी महेश हिरामन शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून पत्नी गौरी महेश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीहून बारामतीत आलेल्या पत्नी गौरीला वैद्यकीय तपासणी करुन घे, असे पतीने सांगितले. याकारणावरुन पती- पत्नीत वाद झाला आणि पत्नीने पतीला लोखंडी विळ्याने मारहाण केली आहे. सदर प्रकरणी पुढील तपास राजश्री आटोळे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.