पुणे - राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील अलका चौक येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जोरदार घोषणा देण्यात येत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेला हा आंदोलन अजूनही सुरच आहे. या आंदोलनात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सकाळी 10 वाजल्यापासूनच सामील झाले असून ते देखील अजूनही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी झाले आहे.
![Competitive examination students protest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-08-mpsc-studenat-aandolan-avb-7210735_13012023201040_1301f_1673620840_202.jpg)
अभ्यासक्रमाचा निर्णय 2025 पासून लागु करा - आम्ही विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत. पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की 2023 पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही.आयोगाने 2025 मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय 2025 पासून लागु करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा अशी, मागणी यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
आंदोलन सुरुच राहणार - राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी सातत्याने विद्यार्थ्यांच्या वतीने याआधी आंदोलने करण्यात आली.पण सरकारने फक्त आश्वासन दिली. नागपूर येथील अधिवेशनात देखील आंदोलन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं आणि वेगळ्याच शिष्टमंडळाला बोलवण्यात आल.आत्ता जो पर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितल.
विद्यार्थ्यांनी आक्रमक - पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र, 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. अभ्यासक्रमातील बदलास विरोध करत नव्या अभ्यासक्रमाबाबतच नियम किंवा नवा पॅटर्न 2025 मध्ये लागू करावा. या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने निर्णय घेतला नाही आम्ही आंदोलन असच सुरू ठेवू अस म्हणत मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहे.