ETV Bharat / state

Farmers become smart : शेतात लावण्यात आलेले पंप मोबाईलवरून होणार ऑपरेट - Company has made new machine

शेतकऱ्यांसाठी आज सर्वात जास्त आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पाणी देणे ( Watering field at night ). पाण्याचे योग्य नियोजन ( Proper planning of water ) आणि कोणतीही जीवितहानी न होता हा तंत्र मोबाईलवर सहज ऑपरेट ( Will operate on mobile ) करता येणार आहे. ( Farmers become smart )

Company has made new machine
कंपनीने बनविले नवीन यंत्र
author img

By

Published : Nov 4, 2022, 12:40 PM IST

पुणे : शेतकऱ्यांसाठी आज सर्वात जास्त आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पाणी देणे ( Watering field at night ). रात्री प्राण्यांचा धोका, विजेचा शॉक बसण्याचा धोका असे अनेक धोके शेतकऱ्याना अंगावर घेऊन रात्रीच्या वेळेस शेतात जाऊन पाणी द्यावे लागते. पण आत्ता हेच शेतातील पाणी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरुन देता ( Will operate on mobile ) येणार आहे.

पंपाबरोबरच वॉल देखील मोबाईलवर ऑपरेट होणार : शेतात लावण्यात आलेले पंप हे आत्तापर्यंत मोबाईलवर ऑपरेट होताना आपण पाहिले आहे. पण आत्ता या कंपनीच्या माध्यमातून पंपाबरोबरच शेतात जे वॉल लावण्यात येतात ते देखील मोबाईलवर ऑपरेट होणार आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मोबाईलच्या माध्यमातून या पंप आणि वॉल द्वारे पाणी सोडू शकतो. तसेच या तंत्राची एक विशेष बाब म्हणजे या द्वारे आपल्याला किती पाणी शेतात सोडायचे आहे हे देखील कळणार आहे. यामुळे पिकांचे नुकसान देखील होणार नाही. पाण्याची देखील बचत होणार आहे.

कंपनीने बनविले नवीन यंत्र

मोबाईलवर सहज ऑपरेट करता येणार : मुंबई आयआयटीमधून इंजिनिअरिंग झाल्यानंतर कंपनीचे सियो जसविर सिंग यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी तयार करायचे आहे असा विचार सुरू केला. संशोधनाला सूरवात केली.आज प्रत्येक गोष्ट ही स्मार्ट फोन वर उपलब्ध असून शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांसाठी काहीतरी तंत्र बनविण्याचा विचार जसविर याने केला आणि या तंत्राची निर्मिती केली. कंपनीच्यावतीने हे जे नवीन तंत्र बनविण्यात आले आहे. यात शेतकर्याने जो पंप बसविला आहे तो आणि जिथं पाण्याचे वॉल बसविण्यात आले आहे. तिथं मोबाईल च्या माध्यमातून पाणी देता येणार आहे. एक कंट्रोलर आहे जो सोलारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतात बसविला जातो. त्याच बरोबर जिथे वॉल आहे तिथे देखील वायरलेस कंट्रोलर बसविले जाते. यामुळे मोबाईल वर जे ॲप आहे त्यावर शेड्युल करून रात्रीच्या वेळी देखील पाणी देता येणार आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि कोणतीही जीवितहानी न होता हा तंत्र मोबाईलवर सहज ऑपरेट करता येणार आहे.

वायरलेस कंट्रोलर कोणतीही सेटिंग न करता होतो ऑपरेट : शेतात कंट्रोलर बसविला जातो. हा कंट्रोलर 60 वॉलला कंट्रोल करत असतो. त्यात 36 वायरलेस वॉल कंट्रोल करू शकतो. जिथे जिथे शेतात पाइपलाइन बसविण्यात आली आहे तिथे तिथे हे वायरलेस कंट्रोलर कोणतीही सेटिंग न करता ऑपरेट होतो. तसेच याची अजूनही एक विशिष्ठ बाब म्हणजे या ॲप मध्ये पिकांना किती पाणी देण्याची गरज आहे. किती पाणी देण्यात आले आहे. हे सर्व दर्शविले जाते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आत्ता यामुळे 80 टक्के पाण्याची बचत देखील होऊ शकते. अस देखील यावेळी जसविर याने सांगितले आहे. हे यंत्र राज्यातील सांगली, सोलापूर, नाशिक, बारामती तसेच पुणे जिल्ह्यातील इतर भागात काही शेतकऱ्यांच्या शेतात हे यंत्र बसविण्यात आले आहे.यामुळे शेतकरी देखील आत्ता स्मार्ट झाले आहे. द्राक्ष बाग, डाळिंब बाग तसेच इतर शेतात हे यंत्र बसविण्यात आले आहे. असे देखील यावेळी जसविर सिंग यांनी सांगितल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.