पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरातील तळेगाव दाभाडे येथे महाविद्यालयीन तरुणाचा खून (Collage Youth Murder) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तळेगाव येथे एकच खळबळ उडाली आहे. 20 ते 25 जणांच्या टोळक्याने कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून (Murder by stabbing with weapons) प्रणव अनिल मांडेकर या 19 वर्षीय तरुणाचा खून केला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात (Talegaon Police arrested 9 accused) घेतले आहे. latest news from Pune, Pune crime
अचानक धारदार शस्त्रांनी झाला हल्ला- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रणव हा मित्राचा वाढदिवस आहे असे म्हणून घराबाहेर पडला होता; पण तो घरात परतच येणार नाही अशी पुसटशी कल्पना प्रणवला नव्हती. प्रणवच्या सोबत असलेल्या विशालचे मंगेशशी फोनवरून वाद झाले होते. दरम्यान, वाढदिवस साजरा करून आल्यानंतर प्रणव हा त्याच्या इतर नऊ मित्रांसह गप्पा मारत थांबला होता. तेव्हा, सहा ते सात दुचाकी वरून 20 ते 25 जणांचे टोळके त्या ठिकाणे आले. विशाल सोबत मंगेशची बाचाबाची झाली. मंगेशच्या सोबत असलेल्या मित्रांकडे कोयता, लोखंडी रॉड होते. हे पाहून प्रणवसह सर्व जण सैरावैरा धावत सुटले.
प्रणवचा निष्पाप बळी गेला का ? काही अंतरावर प्रणवला ठेच लागली आणि तो खाली कोसळला. पाठलाग करत असलेल्या टोळक्याने त्यांना विशालचा साथीदार आहे असे समजून त्याच्यावर कोयता, लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. यात काही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.