पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत चालला असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. या महामारीबद्दल भीती देखील कमी झाल्याने अनेक जण रस्त्यावर बिनधास्त होऊन फिरत आहेत. परंतु, पिंपरीच्या महात्मा फुले नगर येथे घरातच हृदय विकाराच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीने त्याचा मृतदेह काही तास घरात पडून राहिल्याचा असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या भीतीने तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी परिसरातील एकही व्यक्ती धजावला नाही. अखेर नव्हता अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येऊन तो मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात नेला. विधिवत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. हे सर्व पाहता कोरोनामुळे अनेक ठिकाणी संवेदनाशून्य समाज, तर ननावरे यांच्या सारख्या कार्यकर्त्यामुळे माणुसकी जिवंत असल्याचं दिसत आहे.
पिंपरीत कोरोनाच्या भीतीने काही तास मृतदेह घरातच पडून; सामाजिक कार्यकर्त्याने केले अंत्यसंस्कार
पिंपरी चिंचवडमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे त्याच्या मृतदेहाला परिसरातील कोणी व्यक्ती हात लावण्यास धजावत नसल्याने त्याचा मृतदेह काही तास घरातच पडून राहल्याचा प्रकार घडला. दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.