ETV Bharat / state

'शहरातील लहान मुलांची रुग्णालये महापालिकेच्या नियंत्रणात आणावेत' - पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे

कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्वरीत निर्णय घेणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी संबंधित विभागाला यासाठीचे निर्देश दिले आहेत.

शहरातील लहान मुलांचे हॉस्पीटलं महापालिकेच्या नियंत्रणात आणावेत, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांचे निर्देश

author img

By

Published : May 24, 2021, 7:41 PM IST

पिंपरी-चिंचवड - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग लहान मुलांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही शक्यता लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरातील लहान मुलांची सर्व खासगी हॉस्पिटल्स, महापालिकेच्या नियंत्रणात आणावित. त्याबाबतची कार्यवाही त्वरीत सुरू करावी असे निर्देश महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले.

'बालकांसाठी 'एनआयसीयू'ची तयारी ठेवावी'

कोरोना आणि म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संदर्भात आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, चेतन घुले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्वरीत निर्णय घेणे गरजेचे आहे. शहरातील लहान मुलांचे हॉस्पिटल, डॉक्टर, पदाधिकारी व प्रशासनाची बैठक बोलावून याबाबत योग्य ते नियोजन करावे. लहान मुलांना आवश्यक असणारे लसीकरण त्याचबरोबर बालकांसाठी 'एनआयसीयू'ची तयारी ठेवावी. यासाठी लागणाऱ्या औषधांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच, शहरात आढळणाऱ्या 'म्युकरमायकोसिस'च्या रुग्णांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर त्वरीत उपचार करावेत. तसेच रुग्णांची योग्य ती काळजी घेण्यात यावी असेही महापौर माई ढोरे म्हणाल्या आहेत.

'रूग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समुपदेशन आवश्यक'

आमदार महेश लांडगे यांनीही कोरोना संदर्भात प्रशासनाला काही सूचना केल्या. शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. ही समाधानाची बाब आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाकडे दूर्लक्ष करुन चालणार नाही. याबाबत वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांची चाचणी करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसेच, त्यामध्ये आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये विलगीकरण अनिवार्य करावे. रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे समुपदेशन सुरू ठेवावे. प्रशासनास आवश्यक मनुष्यबळ कमी पडत असल्यास खासगी एजन्सी अथवा स्थानिक प्रतिनिधींची मदत घेऊन पुढील धोका लक्षात घेता त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. कामगारांच्या लसीकरणासंदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांची शहरातील खाजगी कंपन्यांनी अंमलबजावणी करावी. याबाबत प्रशासनाच्या वतीने कार्यवाही सुरू ठेवावी. तसेच, महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारुन त्वरीत कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आमदार लांडगे यांनी केल्या. हिंदुस्थान ॲन्टीबायोटिक कंपनीकडे लस उत्पादनाची क्षमता आहे, त्यांनी तशी तयारी देखील दर्शविली आहे.

'लस उत्पादनाबाबात पडताळणीची गरज'

लस उत्पादनाचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असून, त्यासाठी कंपनीला केंद्र सरकारच्या परवानगीची गरज लागणार आहे. यासाठी महापालिकेने कंपनीची लस उत्पादनाबाबात सर्व तयारीची पडताळणी करुन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्रशासनाकडे परवानगीसाठी पाठपुरावा करणे सोयीस्कर होईल, याची काळजी देखिल महापालिकेने घेणे आवश्यक असल्याचेही आमदार लांडगे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - '१२ आमदारांवर कोणते संशोधन सुरु आहे?'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.