पुणे - विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञान कळावे. त्याचबरोबर, त्यांना गणितातील किलो, वजन, बेरीज समजावे या उद्देशाने राजगुरू नगर येथील प्रांगण शाळा आणि किलबिल शाळेमध्ये आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्यांनी आपल्या पालकांना, शिक्षकांना व ग्रामस्थांना भाजी विकली.
यावेळी आठवडी बाजारात आपल्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळून विक्री व्हावी यासाठी चिमुकल्यांची आगळी वेगळी धडपडही पाहायला मिळली. आपल्या वस्तूंचे बाजार भाव खरेदीदारांना मोठ्याने ओरडून ही चिमुकली मुले सांगत होती. त्यामुळे, ग्राहकांनाही स्वस्त व चांगला माल घेण्यास मदत होत होती. यातूनच या मुलांचे शेती व शिक्षणातील कौशल्य अगदी सहज दिसून येत होते. चिमुकल्यांच्या या बाजारात कोबी, फ्लॉवर, बटाटा, भेंडी, काकडी, मुळा, पालक, मेथी, आवळा, पेरू, केळी, कडधान्य, शेव, मुरमुरे शेंगदाणे व शालेय साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मालाची विक्री झाल्यानंतर ही चिमुकली मुले आपला हिशोब अगदी चोखपणे करत होती. त्यामुळे, खऱ्या अर्थाने या वयातही व्यावहारिक ज्ञान या चिमुकल्या मुलांमध्ये पाहायला मिळाले.
हेही वाचा- स्वराज्यरक्षक संभाजी मालिका संपल्यानंतर संपूर्ण वेळ मतदार संघालाच - डॉ. अमोल कोल्हे