पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा होत असताना या सोहळ्याचे मुख्य आकर्षण बाल वारकरी ठरत आहेत. इंद्रायणी घाटावर हे बाल वारकरी आपल्या अभंगवाणीतून माऊलींचे पसायदान स्मरण करण्यात दंग आहेत.
आळंदी ते पंढरपूर असा आषाढी वारीचा प्रवास सध्या वारकऱ्यांचा सुरू आहे. यादरम्यान हे बाल वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. हे फक्त वारीमध्ये सहभागीच झाले नाहीत तर माऊलींचे पसायदान म्हणून वारीतील वारकऱ्यांना मंत्रमुग्ध करत आहेत. त्यामुळे या बाल वारकऱ्यांचे सर्वजण कौतुक करत आहेत.