ETV Bharat / state

Rajeev Kumar : देशात शंभर किंवा त्याहून अधिक वयोगटातील 2.5 लाखांहून अधिक मतदार - राजीव कुमार - Rajeev Kumar

देशात 100 किंवा त्याहून अधिक वयोगटातील 2.5 लाखांहून अधिक मतदार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ( Chief Election Commissioner Rajeev Kumar ) यांनी दिली. पुण्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.

Organizing voter awareness cycle rally
मतदार जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन
author img

By

Published : Nov 9, 2022, 10:11 AM IST

पुणे : देशात 100 किंवा त्याहून अधिक वयोगटातील 2.5 लाखांहून अधिक मतदार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ( Chief Election Commissioner Rajeev Kumar ) यांनी दिली. ते पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल ( Shree Shivchhatrapati Sports Complex ) येथे मतदार जागृती सायकल रॅलीला ( Voter awareness cycle rally ) हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बोलत होते.

मतदार जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन : पुण्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अनुषंगाने विंविध कार्यक्रमांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ झाला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

मतदार जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन

पुण्यात होणार विविध कार्यक्रम : निवडणूक आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन मल्टी मीडिया प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच त्यांनतर निवडणूक आयुक्तांचा ट्रान्सजेंडर समुदायाशी संवाद होणार आहे. मतदार जागृती मंचाच्या नोडल अधिकाऱ्यांशी संवाद असे विविध कार्यक्रम पुण्यात होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.