ETV Bharat / state

ओशो आश्रम भूखंड विक्री : अनुयायांच्या तक्रारीनंतर धर्मदाय आयुक्त देणार 15 मार्चला निर्णय

author img

By

Published : Mar 6, 2021, 7:19 PM IST

Updated : Mar 6, 2021, 7:36 PM IST

ओशो आश्रम हा जगभरात अनुयायी असलेला आश्रम आहे. ओशो रजनीश यांनी सुरू केलेला हा आश्रम पुण्यातील कोरेगाव पार्क येथे अठरा एकर परिसरात आहे. आध्यात्मिक गुरू ओशो यांच्यावर श्रद्धा असलेले अनेक अनुयायी या आश्रमाशी जोडलेले आहेत.

osho ashram
ओशो आश्रम

पुणे - येथील ओशो आश्रमातील प्रत्येकी दीड एकराचे दोन असे एकूण तीन एकराचे भूखंड आश्रम ट्रस्टकडून विक्रीला काढण्यात आले आहेत. मात्र, या विक्रीला ओशो रजनीश यांच्या अनुयायांनी विरोध केला आहे. शेकडो अनुयायांनी विरोधाची पत्र पाठवली आहेत. या प्रक्रियेविरोधात आता ओशोंचे अनुयायांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या सगळ्या प्रकरणावर 15 मार्चला सुनावणी होणार आहे.

ओशो अनुयायींच्या प्रतिक्रिया.

आश्रमाची मालकी ओशो इंटनॅशनल फाऊंडेशनकडे -

ओशो आश्रम हा जगभरात अनुयायी असलेला आश्रम आहे. ओशो रजनीश यांनी सुरू केलेला हा आश्रम पुण्यातील कोरेगाव पार्क येथे अठरा एकर परिसरात आहे. आध्यात्मिक गुरू ओशो यांच्यावर श्रद्धा असलेले अनेक अनुयायी या आश्रमाशी जोडलेले आहेत. सध्या हा आश्रम वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या प्रसिद्ध ओशो आश्रमातील प्रत्येकी दीड एकराचे दोन असे एकूण तीन एकराचे भूखंड आश्रम ट्रस्टकडून विक्रीला काढण्यात आले आहेत. सध्या या आश्रमात त्याची मालकी स्वित्झर्लंडमधील झुरीच येथील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनकडे आहे. याच फाउंडेशनच्या माध्यमातून येथील ट्रस्टींनी हे भूखंड विकायला काढले आहेत.

हेही वाचा - छापेमारीवर तापसी...'नॉट सो सस्ती एनीमोर', कंगनाचे धडाकेबाज प्रत्युत्तर

107 कोटींची बोली -

कोरोनानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खर्च वाढल्यामुळे आश्रमाला पैशांची गरज असल्याने हे भूखंड विक्रीला काढले असल्याचे आश्रमाच्या ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. आश्रम ट्रस्टने यासाठी मुंबईतील वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. या जागेच्या खरेदीसाठी तीन बोल्या लावण्यात आल्या होत्या. त्यात सर्वात जास्त म्हणजे तब्बल 107 कोटी रुपये किमतीची बोली राजीव नयन राहुल बजाज यांनी लावली.

15 मार्चला निर्णय -

दरम्यान, या विक्रीला ओशो रजनीश यांच्या अनुयायांनी विरोध केला आहे. शेकडो अनुयायांनी विरोधाची पत्र पाठवली आहेत. या प्रक्रियेविरोधात आता ओशोंचे अनुयायांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या सगळ्या प्रकरणावर 15 मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे 15 मार्चला धर्मदाय आयुक्त काय निर्णय देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या

Last Updated : Mar 6, 2021, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.