ETV Bharat / state

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : 15 सप्टेंबरला आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार

आज पार पडलेल्या सुनावणीसाठी आरोपी सचिन अंदुरे, वीरेंद्रसिंह तावडे, एडवोकेट संजीव पुनाळेकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. आरोपी विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होता. तर आरोपी शरद कळसकर हा न्यायालयासमोर अनुपस्थित होता.

dr narendra dabholkar
डॉ. नरेंद्र दाभोलकर
author img

By

Published : Sep 7, 2021, 5:50 PM IST

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आठ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. मात्र, याप्रकरणी अजूनही आरोपींना शिक्षा झाली नाही. पुण्यातील विशेष न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू आहे. यातील आरोपींवर आज दोषारोपपत्र सादर करण्यात येणार होते. मात्र, यातील आरोपींनी वकील आणि कुटुंबीयांना भेटू देण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्यायालयाने ही विनंती मान्य केली. त्यानंतर आता येत्या 15 सप्टेंबर रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. पुणे न्यायालयात याप्रकरणी आज (मंगळवारी) सुनावणी पार पडली.

आज पार पडलेल्या सुनावणीसाठी आरोपी सचिन अंदुरे, वीरेंद्रसिंह तावडे, एडवोकेट संजीव पुनाळेकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. आरोपी विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होता. तर आरोपी शरद कळसकर हा न्यायालयासमोर अनुपस्थित होता. बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले तर सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सरकारची बाजू न्यायालयात मांडली.

हेही वाचा - अखेर परमबीर सिंह यांच्याविरोधात अटक वारंट जारी; चांदीवाल आयोगाचा निर्णय

15 सप्टेंबरला खटल्याची सुनावणी -

दरम्यान, आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर कोर्टातील नावंदर न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी न्यायाधीशांनी आरोपींना गुन्हा कबूल आहे का अशी विचारणा केली? त्यावर आरोपींनी कोरोनामुळे कुटुंबीय आणि महिलांशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्याची विनंती केली. न्यायाधीशांनी आरोपींची ही विनंती मान्य केली आहे. येत्या 15 सप्टेंबर रोजी या खटल्याची सुनावणी पुन्हा होणार आहे. त्यामुळे इतिहास 15 सप्टेंबर रोजी या प्रकरणातील आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.

हेही वाचा - Urban Naxalism Case : रोना विल्सन यांना वडिलांच्या अंत्यविधीसाठी तात्पुरता जामीन मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.