पुणे - राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका शिंदे गट आणि भाजप एकत्रितपणे लढणार (Shinde group and BJP) असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. (Chandrashekhar Bawankule press conference).
राष्ट्रवावादीने आव्हाडांचे निलंबन करायला हवे - राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या विरोधात आंदोलन करताना आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. यावर बावनकुळे म्हणाले की तो व्हिडीओ पाहा. राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे निलंबन करायला हवं. तसेच, अशा घटना होत राहतात अस बोलणाऱ्या विरोधातही गुन्हा दाखल करावा अशी मागणी बावनकुळे यांनी केली. यासोबतच आमदारकीचा राजनामा द्यायचा असेल तर द्या, अजित पवार किंवा शरद पवार राजनामा घेतील का? असा सवाल उपस्थित करत बावनकुळे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे पवारांच्या ट्रॅपमध्ये अडकले - राज्यात मध्यावधी निवडणुका होतील यावर बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या डायसला फक्त चार लोक राहतील, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विधान केले जात आहे. गजानन कीर्तीकर यांना जावं लागतं हे वाईट आहे. तसेच पवार ट्रॅप मध्ये उद्धव ठाकरे अडकले आणि त्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं. 2024 ला चारच लोक राहतील. चांगले कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत. अस बावनकुळे म्हणाले.
भारत जोडो यात्रेचं लोकांना देणघेणं नाही - भारत जोडो यात्रे बाबत बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या यात्रेचा काही परिणाम झाला नाही. राहुल गांधी यांच्या यात्रेचं लोकांना काही घेणं देणं नाही. पहिले फोटो अन आताचे फोटो पहा. तेच ८०० कार्यकर्ते कायम त्या यात्रेत आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. चित्रा वाघ यांच्या विषयी बोलताना, त्यांनी पत्रसंवेदनशील उत्तर दिलं पाहिजे असे बावनकुळे म्हणाले. वाघ यांचा व्हीडीओ पाहायला हवा. असं व्हायला नको होतं. महाविकास आघाडी सरकारनेच राठोड यांच सगळं बंद केलं होतं, असं देखील यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.