पुणे : आज पाटणा येथे देशातील विरोधी पक्षाच्या नेतेमंडळींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित आहे. आज विरोधी पक्षातील बैठकीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 2019 ला असेच देशातील 17 दल एकत्र आले होते. तरी सुद्धा मोदी यांना स्पष्ठ बहुमत मिळाले. आता ही जी 2024 च्या निवडणुकीसाठी मोट बांधली जात आहे. ती फक्त त्या त्या पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. यांना यांच्या मुलांची तसेच कुटुंबीयांची चिंता आहे. हे लोक जेवढे एकत्र येतील तेवढा जास्त फायदा हा मोदी यांना होणार आहे, असे यावेळी बावनकुळे म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर होते, यावेळी ते बोलत होते.
धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा इतिहास : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टिका केली. ज्या राज्यात कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांचा जसा इतिहास राहिला आहे तसे ते बोलत आहेत. सत्ता गेल्यावर समाजात, धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा इतिहास हा पावरांचा 40 वर्षापासूनच आहे. म्हणून ते आमच्यावर टीका करत आहेत. शरद पवारांनाच बुध्दी सुचते की, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये जाऊन दंगे करायचे. असे यावेळी बावनकुळे म्हणाले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था : मणिपूर येथील घटनेबाबत तसेच इतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था बाबत बावनकुळे म्हणाले की, जिथे जिथे राज्यात ज्या ज्या पक्षाचे सरकार आहे, त्यांनी ते पाहावे. राज्य सरकार जेव्हा केंद्राला मदत मागते तेव्हाच केंद्र हस्तक्षेप करतो. असे कुठल्याही राज्यात हस्तक्षेप करत नाही.असे देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.
बैठकीला कोण-कोण उपस्थित होते : विरोधी पक्षांच्या बैठकीत 15 पक्षांचे 27 नेते उपस्थित होते. बैठकीला नितीश कुमार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, मल्लिकार्जुन खरगे, भगवंत मान, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे, शरद पवार, लालू प्रसाद, अखिलेश सिंह यादव, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, टीआर बाळू, दीपंकर भट्टाचार्य, अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, केसी वेणुगोपाल, सुप्रिया सुळे, मनोज झा, फिरहाद हकीम, प्रफुल्ल पटेल, राघव चढ्ढा, संजय सिंग. संजय राऊत, राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग, संजय झा, सीताराम येचुरी, आदित्य ठाकरे डी राजा यांनी हजेरी लावली.
हेही वाचा -