ETV Bharat / state

तरुणांनो सरकारी नोकरीची कल्पना डोक्यातून काढून टाका - चंद्रकांत पाटील - job

तरुण-तरुणींनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे उद्योग निर्माण करून इतरांसाठी नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले आहे.

author img

By

Published : Feb 18, 2019, 12:06 AM IST

Updated : Feb 18, 2019, 7:41 AM IST

सांगली - संगणकीकरणामुळे सरकारी नोकऱया कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे तरुण-तरुणींनी सरकारी नोकरीचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे. तरुणांनी स्वतः रोजगार निर्माण केले पाहिजेत असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. सांगली महापालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

तरुणांनो सरकारी नोकरीची कल्पना डोक्यातूनच काढून टाका - चंद्रकांत पाटील
undefined

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत मोफत नोकरी कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळावा रविवारी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्याचा समारोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. याप्रसंगी महापालिका क्षेत्रातील बचत गटांना कर्जपुरवठा धनादेशाचे वाटप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच, रोजगार मेळावादरम्यान नोकरी मिळालेल्या तरुण-तरुणींना निवडीचे पत्र मंत्री पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या प्रसंगी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तरुण-तरुणींनी सरकारी नोकरी ही कल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे, असे सांगितले. दिवसेंदिवस सरकारी नोकऱया कमी होत चालले आहेत. आणि दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारी नोकरी मिळणे कठीण आहे, असे ते म्हणाले.

तरुणांनी आता खासगी नोकऱ्यांकडे वळले पाहिजे आणि या ठिकाणी आता सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही. कारण, नव्या कायद्यामुळे आता नोकरदाराला कामावरून काढणे तसेच सोपे राहिले नाही. त्याचबरोबर खाजगी नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून बचत करून गुंतवणूक केल्यास सरकारी नोकरीपेक्षा ते फायद्याचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. गुंतवणुकीसाठी सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी लागते कशाला? असा सवाल उपस्थित करत तरुण-तरुणींनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे उद्योग निर्माण करून इतरांसाठी नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले आहे.

undefined

या मेळाव्याला सांगलीच्या महापौर संगीता खोत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पदाधिकारी आणि तरुण - तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:
सरफराज सनदी - सांगली .

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_17_FEB_2019_CHANDRKANT_PATIL_ON_ROJGAR_SARFARAJ_SANADI
TO -
R_MH_2_SNG_17_FEB_2019_CHANDRKANT_PATIL_ON_ROJGAR_SARFARAJ_SANADI

स्लग - सरकारी नोकऱ्या यापुढे मिळणे अवघड,त्यामुळे सरकारी नोकरीचे कल्पना डोक्यातून काढून टाका - चंद्रकांत पाटील .

अँकर - कॉम्प्युटराइज्ड मुळे दिवसेंदिवस
सरकारी नोकर्‍या कमी होत चालल्या आहेत.त्यामुळे तरुण-तरुणींनी सरकारी नोकरीचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे.आणि सरकारी नोकरी लागतेच कशाला असा सवाल करत तरुणांनी स्वतः
रोजगार निर्माण केले पाहिजेत असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.ते आज सांगलीमध्ये महापालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात बोलत होते.

Body:व्ही वो - सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत मोफत नोकरी कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळावा आज सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता.या रोजगार मेळाव्याचा समारोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.याप्रसंगी सांगलीच्या महापौर संगीता खोत,महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पदाधिकारी व तरुण - तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्या दरम्यान महापालिका क्षेत्रातील बचत गटांना पालिकेच्या विशेष योजनेतून अर्थ साहाय्य करण्यात आलेल्या कर्जपुरवठा धनादेशाचे वाटप मंत्री पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.तसेच आज पार पडलेल्या रोजगार मिळावा दरम्यान नोकरी मिळालेल्या तरुण-तरुणींना निवडीचे पत्र ही मंत्री पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.या प्रसंगी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तरुण-तरुणींनी सरकारी नोकरी ही कल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे. कारण दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कॉम्प्युटराइज्डमुळे कमी होत चालले आहेत.आणि दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारी नोकरी मिळणे कठीण आहे.असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.त्याचबरोबर तरुणांनी आता खाजगी नोकऱ्यांकडे वळले पाहिजे आणि या ठिकाणी आता सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही.कारण नव्या कायद्यामुळे आता नोकरदाराला कामावरून काढणे तसेच सोपे राहिले नाही.त्याचबरोबर खाजगी नोकरीतुन मिळणाऱ्या पैशातून बचत करून गुंतवणूक केल्यास सरकारी नोकरी पेक्षा ते फायद्याचे ठरेल,असे स्पष्ट करत गुंतवणुकीसाठी
सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या आहेत.त्यामुळे सरकारी नोकरी लागते कशाला ? असा सवाल उपस्थित करत तरुण-तरुणींनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे उद्योग निर्माण करून इतरांच्यासाठी नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत,असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.

बाईट - चंद्रकांत पाटील - महसूल मंत्री .

Conclusion:
Last Updated : Feb 18, 2019, 7:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.