ETV Bharat / state

'काहीही झालं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही' - Chandrakant Patil on agriculture law

काही झालं तरी कायदा रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी आंदोलनावर दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Dec 6, 2020, 3:04 PM IST

पुणे - आज (रविवार) दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही झालं तरी कायदा रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल. सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून कायदा तयार केला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. तेव्हा ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी कायदा रद्द होणार नसल्याचे ठणकावून सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल करण्यात आलेले नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेच आहे. फक्त आत्ता या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर शेतमाल विकण्याची परवानगी मिळाली आहे. प्रश्न फक्त किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) होता. तर त्याप्रकरणी केंद्र सरकार एमएसपी देण्याचे लेखी मान्य करायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार, या भूमिकेला काहीही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाईल, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

विरोधक राष्ट्रपतींची भेट घेत असतील तर त्यांचे स्वागत -

देशात करण्यात आलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीत कोणीही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची भेट घेऊ शकतो. विरोधी पक्षातील नेते भेट घेत असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

आंबेडकरांचा आयुष्यभर ऋणी -

आंबेडकर यांना स्वतः खूप अन्याय सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतर 1000 वर्ष बदलावी लागणार नाही, अशी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली आहे. देशातील प्रत्येक जण हा आंबेडकरांचा आयुष्यभरासाठी ऋणी असला पाहिजे, अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली, असेही पाटील म्हणाले.

महिलांना मताचा अधिकार -

जगात अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मताचा अधिकार मिळवून दिला आहे. गरिबाला एक मत आणि टाटा बिर्ला यांनाही एकच मत, असा समानतेचा अधिकार मिळवून दिला. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.