ETV Bharat / state

Jal jeevan Mission in Pune : ग्रामीण भागातील नागरी सुविधांची उणीव दोन वर्षात भरून काढू - चंद्रकांत पाटील - जल जीवन मिशन कार्यशाळेचे उद्धाटन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पुण्यात जलजीवन मिशन कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले. गावातील नागरी सुविधांची उणीव दोन वर्षात भरून काढली जाईल अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात १४५ कोटींची कामे मंजूर करण्यात आले आहेत.

chandrakant patil
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
author img

By

Published : Jan 28, 2023, 2:42 PM IST

पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित ‘संकल्प २०२३-हर घर नल से जल’ कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी उपस्थित होते.

१४५ कोटींची कामे मंजूर : जिल्ह्यात जनसुविधेची १४५ कोटींची १ हजार ६७८ कामे मंजूर करण्यात आली आहेत. नागरी सुविधेच्या ५६ कोटी रुपयांच्या ४७० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावातील रस्त्यांची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हर घर नल से पानी : देशात ‘हर घर नल से पानी’ योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. ग्रामीण महिला खूप दूरवरून डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणतात. ग्रामीण भागातील ९० टक्के आजार पाण्यामुळे होतात. हे आजार दूर करण्यासाठी आणि महिलांचे कष्ट दूर करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. योजना सुरू करण्यासाठी आणि योजना पूर्ण झाल्यावर तिचा लाभ नागरिकांना देण्यासाठी उशिर करू नये, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सरपंचांची जबाबहदारी महत्वाची : सरपंचांना गावात कोणती योजना आणावी याची माहिती असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत केंद्राकडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीपैकी ८५ टक्के रक्कम थेट मिळते आहे. त्याचा विनियोग करताना गावाच्या गरजा आणि समस्या लक्षात घेऊन विकासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुका पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

१ हजार ३५४ गावांना पाणी : ग्रामीण भागात १ हजार ५२१ प्रकल्प राबवून १ हजार ३५४ गावात जल जीवन मिशन अंतर्गत योजना करण्यात येत आहे. उर्वरीत काम गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत २९९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातील ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्राकडून निधी प्राप्त झाला आहे. सरपंचांनी योजनेसाठी जागा उपलब्ध करून घ्यावी आणि स्थानिक वाद मिटवून प्रत्येक घरात नळ जोडणी करून द्यावी. योजनेसाठी वेळेवर वीज जोडणी करून घ्यावी आणि १० टक्के लोकवर्गणी जमा करून घ्यावी. कामाची गुणवत्ता चांगली राहील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

गावाचा विकास करण्याची चांगली संधी : जिल्ह्यात तरुण सरपंचांची संख्या अधिक आहे. या सरपंचांना गावाचा विकास करण्याची चांगली संधी आहे. त्यांनी जल जीवन मिशनचे कामही चांगल्यारितीने करावे. तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावी, असे श्री.प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्यात घन कचरा व्यवस्थापनाचे सर्वाधिक काम झाले. गतवर्षी करवसूलीत २५ टक्के वाढ होऊन ३४० कोटींची कर वसूली झाली आहे. जिल्ह्यातील ९ लाख २७ हजार घरांपैकी ८९ टक्के घरांवर महिलांची नावे लागली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा : Sanjay Raut : वंचित फक्त शिवसेनेसोबत, महाविकास आघाडीचा तो घटक नाही - राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.