ETV Bharat / state

यांना एजंट म्हणून ठेवलंयं की काय?, चंद्रकांत पाटलांचे मुश्रीफ यांना प्रतिउत्तर - हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यात एकाही विधानसभेच्या जागेवर उभे राहण्याची चंद्रकांत पाटील यांची लायकी नाही. त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा सोडून ते पुण्याला गेले, असे म्हणत मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती त्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिले.

chandrakant patil criticizes to hasan mushrif in pune
यांना एजंट म्हणून ठेवलंयं की काय?, चंद्रकांत पाटलांचे मुश्रीफ यांना प्रतिउत्तर
author img

By

Published : Apr 5, 2021, 12:26 AM IST

पुणे - सध्याच्या राजकारणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काही कमी होताना दिसून येत नाहीत. दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येतात. कोल्हापूर जिल्ह्यात एकाही विधानसभेच्या जागेवर उभे राहण्याची चंद्रकांत पाटील यांची लायकी नाही. त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा सोडून ते पुण्याला गेले, असे म्हणत मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिले.

दुसऱ्या जागी जाऊन निवडून यायला धमक लागते. हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दुसऱ्या एखाद्या मतदारसंघात जाऊन निवडून येऊन दाखवावे. कागल मतदारसंघामध्ये मतांची विभागणी करून निवडून येणे काही विशेष नाही. पण, मला आता ते सर्व खुलेपणाने सांगायचे नाही. मुश्रीफ हे माझे जवळचे मित्र आहेत. तुम्हाला काही तब्येतीचा परिणाम झाला आहे का? महाराष्ट्र्रात कोणीही काही बोलले तरीही कोण बोलत नाही. मला आश्चर्य वाटत आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मी वर्षभर इतके बोललो तरीही ते काहीही आतापर्यंत बोलले नाहीत. पण, पहिली प्रतिक्रिया ही मुश्रीफ यांची असते. यांना एजंट म्हणून ठेवलेय की काय? अशा शब्दात पाटील यांनी मुश्रीफांना प्रत्युत्तर दिले.

चंद्रकात पाटील बोलताना....

चंद्रकांत पाटील म्हटले की लगेच बिथरतात -

महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही कोणावरही टीका करा. मात्र मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही बोललो किंवा शरद पवार यांच्यावर काही बोललो तर सर्वप्रथम हसन मुश्रीफ हेच प्रतिक्रिया देत असतात. हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटील म्हटले की लगेच ते 'वायब्रेट' होतात, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - पुणे पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ; मास्क न घालण्यासाठी आता काय द्याल कारण?

हेही वाचा - अर्धवट टाळेबंदीने कोरोनाही जाणार नाही आणि सर्वसामान्यांचे दुःखही कमी होणार नाही - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.