पुणे : चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार आणि नाना पटोले यांच्यावर संतप्त होत अनेक प्रश्न देखील विचारले आहेत. मी गिरणी चालकाचा मुलगा आहे. थेट चॅलेंज करतो हे पवारांना खूपतेय. पण मी डायरेक्ट चॅलेंज करतो आता सगळी प्रकरणे बाहेर काढणार, अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. रोहित पवार यांच्यावर टीका करता त्यांनी म्हटले की, मी चळवळीतून पुढे आलेलो आहे. तुझ्यासारखा राजकीय परंपरेने नाही. चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत (Chandrakant Patil Criticized Rohit Pawar in Pune) होते.
केवळ राजकारण सुरू : चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) म्हणाले की, अजित पवार का गप्पा बसले आहेत? काल माझ्यावर आणि राज्यपालांवर बोलत होते. शाईफेक करणाऱ्यांची निंदा करा, तुम्ही समर्थन करत आहात. छगन भुजबळ यांनी म्हटले स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. तुमच्या अंगावर ही शाई फेकूयात काय? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा प्रश्न त्यांनी भुजबळ यांना केला आहे. पुढे ते म्हणाले की, नाना पटोले माझ्या समोर ये आणि डिबेट कर. माझे काय चुकले आहे. केवळ अन केवळ राजकारण सुरू आहे. पण इतकी बुद्धी भ्रष्ट होऊ देऊ नका. एवढे राजकारण करू नका. हा भस्मासुर तुमच्यावर ही पलटेल असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Criticized Rohit Pawar) म्हणाले.
चळवळीतून मोठा झालो : मी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेतो. मी शर्ट बदलून कार्यक्रमाला गेलो. त्या वक्तव्यावरून मी तीन वेळेस स्पष्टीकरण दिले आणि दिलगिरी व्यक्त केली. मी कार्यकर्त्यांच्या घराघरात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा म्हणून त्यांच्या आई- वडिलांना सांगितले. त्या चंद्रकांत पाटलांच्या मनात अनादर आहे? अन तुम्ही शाई फेकणार? तुम्ही आंबेडकर यांचे पुस्तक, एक पान तरी वाचले आहे का? पुढे ते म्हणाले की, रोहित पवारांना (Rohit Pawar) बाबासाहेब आंबेडरकर वाचून माझ्याकडे यायला सांगा. मी वाचलेत बाबासाहेब. रोहित पवार तुझ्यासारख्या राजकीय परंपरेने नाही, तर चळवळीतून मोठा झालो आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.