पुणे - राज्यात धुरंधर राजकारणी असणाऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुरून उरेल असे राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे. ते पुण्यात फडणवीस यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
फडवणीस यांच्या गाजलेल्या भाषणाचा पुस्तक प्रकाशन सोहळा - पुण्यातील मॉडर्न कॉलेज सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या गाजलेल्या भाषणाचा पुस्तक प्रकाशन सोहळा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी भाषणात बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.
फडणवीस प्रचंड अभ्यासू - देवेंद्र फडवणीस म्हणजे प्रचंड अभ्यास करणारे नेतृत्व आहे. मुद्देसूद आकडेवारी सहित प्रश्न मांडणे, त्याचबरोबर एकदा बोललेलं कधीही माघार न घेणारे हे फडणवीसांचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रश्नावर विधानसभेत ज्यावेळेस ते बोलतात, प्रश्न मांडतात, त्यावेळेस त्याचा प्रचंड अभ्यास असतो. सचिन वाझे प्रकरणात तत्कालीन सरकारला सात वेळा सभागृह तहकूब करावे लागलं होतं. शेवटी सचिन वाझे निलंबित करण्याची वेळ सरकारवर आली होती असे, म्हणत चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
फडवणीस कधीही माघार घेत नाहीत - महाविकास आघाडीच्या काळात दोन भोंगे वाजायचे एक संजय राऊत, देसरे नवाब मलिक त्यावेळीच मला वाटलं होतं नवाब मालिकांचं अवघड होणार. फडणवीसांनी ९३ चा सगळा अभ्यास केला. हा माणूस आपल्याला कुठे सापडतो हे पाहिलं. शेवटी नवाब मालिकांना सुद्धा तुरुंगात जावं लागलं. त्यामुळे आपण केलेले प्रश्न आपण केलेल्या अभ्यास याच्या जीवावर देवेंद्र फडवणीस यांच्या सारखं नेतृत्व कधीही माघार घेत नाही असे देखील पाटील म्हणाले.
धुरंधर नेत्याला पुरुन उरणारे नेते - देवेंद्र फडणवीस हाराष्ट्राचे नेते आहेत. ते देशात सुद्धा फिरत नाहीत. कारण मी बाहेर गेल तर महाराष्ट्रात काय होईल याची चिंता त्यांना लागलेली असते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये माझ्या इतका धुरंधर कुणी नाही असं वाटणाऱ्या नेत्याला पुरून उरणारे असे नेतृत्व निर्माण झालेले आहे, असा टोला त्यांनी नाव न घेता शरद पवार यांना लगावला आहे.
गाजलेल्या भाषणाचा प्रकाशन सोहळा - भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या गाजलेल्या भाषणाचा संग्रह करून एक पुस्तक प्रकाशन केलं. पुस्तक प्रकाशनाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील जगदीश मुळीक, आमदार भीमराव अण्णा तापकीर, माजी आमदार मेघा कुलकर्णी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे.