पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Guardian Minister Chandrakant Patil ) यांच्यावर काल पिंपरी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात 11 पोलिसांवर निलंबनाची कारवाई ( Suspension action against eleven policemen ) करण्यात आली. याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल मत व्यक्त केले आहे. हे जे शाईफेक करण्यात आली आहे. ती शाईफेक पूर्वनियोजित होती. यात पत्रकार पण आहे. त्याला देखील अटक करण्यात आली आहे. हे कोंस्पेरेसी उलगडली पाहिजे आणि यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. याला आम्ही सोडणार नाही. असे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
अकरा पोलिसांवर निलंबनाची कारवाई : पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते यावेळी ते बोलत होते. अकरा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यावर पाटील म्हणाले की मी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगितले आहे की, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू नका. त्यांची चूक आहे. त्यांना ट्रान्स्फर करा निलंबित करू नका. मला माझे पक्षश्रेष्ठ तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर भरवसा आहे, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.
शांततेने निदर्शने करा : कोविड काळात डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची घरी जयंती साजरी व्हावी यासाठी मी आग्रही होतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत माझ्या मनात काय आदर आहे ते तुम्ही सांगू नका. तुमच्या मनात जर आदर असता तर काल तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची घटना पायदळी तुडवली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचे राज्य शिकवले आहे. अशा पद्धतीने ठोकशाही गुंडशाही हे शिकवले नाही. लोकशाही मार्गाने काम केले पाहिजे ठोकशाही मार्गाने आम्हालाही येत. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. शांततेने निदर्शने करा. असे यावेळी पाटील यांनी सांगितले आहे.