पुणे - राज्यात सध्या गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल ( Change in environment ) झाले असून राज्यात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण ( Cloudy weather in Maharashtra ) झाले आहे. तर काही भागात पाऊसाचा सरी ( Rain in some parts of Maharashtra ) पडत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसानेही हजेरी लावली आहे. येत्या 48 तासात राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या ( Forecast of Pune Meteorological Department ) वतीने वर्तविण्यात आलं आहे.
दाबाच्या पट्ट्याच्या प्रभाव राज्यात - बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ शमल्यानंतर त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांत पाऊस झाला. कमी दाबाच्या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावरही सध्या सुरू झाला आहे. पुढील दोन दिवस हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बाष्पाचा पुरवठा होत आहे. प्रामुख्याने सध्या महाराष्ट्राच्या दक्षिण-पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता आहे.
16 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण - गेल्या काही दिवसांपासून राज्यात जी थंडी वाढली होती. ती या वातावरणीय बदलामुळे कमी झाली आहे. येत्या 16 डिसेंबरपर्यंत राज्यात अशीच ढगाळ वातावरण राहणार असून त्यानंतर पुन्हा एकदा थंडी वाढणार असल्याचं अंदाज यावेळी हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यापी यांनी व्यक्त केलं आहे.