पुणे Raj Thackeray: Raj Thackeray : 22 जानेवारीला राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे. त्याचा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होत असताना बाकी भानगडीत पडू नका. ( Raj Thackeray Appeal) राम मंदिरासाठी कारसेवकांनी केलेल्या कष्टामुळे मिळालेला हा क्षण आहे. त्यामुळे कारसेवकांसाठी 22 तारखेला जसं शक्य आहे तसं आरती, उत्सव, आनंद साजरा करा. (Ram Temple Installation) लोकांना कुठलाही त्रास न होता उत्सव साजरा करण्याचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहेत.
गाव स्वच्छ करण्याचं आवाहन : पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी आज (शनिवारी) मनसेचा ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांना राज ठाकरे यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, गावात जाताना माझा एकच सल्ला आहे की, गाव स्वच्छ करा. गाव स्वच्छ केलं तर मनं स्वच्छ होतील आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पुण्यात आज ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
मनसुद्धा स्वच्छ करा : ग्रामीण भागामध्ये स्वच्छता असणं हे फार महत्त्वाचं आहे. आज ग्रामीण भागातले युवक शहराकडे येत आहेत. शहरातले युवक परदेशात जात आहेत. ते इथं शिक्षण नाही म्हणून जात नाहीत. इथे नोकऱ्या नाहीत असं म्हणून जात नाही. इथेही शिक्षण आहे नोकऱ्या आहेत. पण सभोवतालचे वातावरण आहे ते राहण्यायोग्य स्वच्छ ठेवलं पाहिजं. ते केलं तर आपल्या देशाची प्रगती होणार आहे. त्यामुळे तुम्ही इथून जाताना हा संदेश घेऊन जा. आपल्या गावभागातली स्वच्छता करा. स्वच्छता बैठका घ्या आणि मनसुद्धा स्वच्छ करा, असा सल्ला ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना राज ठाकरे यांनी दिला आहे.
घोषणाचा पाऊस पाडणाऱ्यांवर टीका : मनसेच्या ग्रामपंचायती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे ग्रामपंचायत आणि गाव परिसर स्वच्छ करणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच लाखाचा निधी मी देतो, अशी घोषणासुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी घोषणांचा पाऊस पाडणाऱ्यांवरतीसुद्धा सडकून टीका केली आहे. मी जेवढे माझ्या हातात आहे तेवढेच बोलतो. त्यांच्यासारखं नाही, पुणे शहराला आज 5000 कोटी देतो, तुमच्या हातात काय घंटा? त्यामुळे वास्तविक बोललं पाहिजे. खरं आहे ते वागलं पाहिजे ते तुम्ही करा. तुम्हाला मतदान देणाऱ्या लोकांचं समाधान करा, विकास करा असा सल्लासुद्धा राज ठाकरे यांनी पुण्यात दिला आहे.
हेही वाचा: